जळगाव : श्रावण महिना (Shravan Mahina) सुरू झाल्यापासून साखरेच्या दरात वाढ होत असून, मागणी वाढल्याने आणि जागतिक घडामोडींमुळे सण-उत्सवात साखरेला चांगले दर मिळू लागले आहेत. मागील सात महिन्यात (Sugar Market) कसे दर मिळाले आणि काल देशभरातील बाजारात काय भाव होता, हे पाहुयात....
सध्या श्रावण महिना सुरू असून, लवकरच गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. या काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थासाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे, पुरवठ्यावर दबाव येऊन साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सात महिन्यातील साखरेचे दर पाहिले असता जानेवारी महिन्यात ४३ रुपये किलो, फेब्रुवारी महिन्यात ४४ रुपये किलो, मार्च महिन्यात ४४ रुपये किलो, एप्रिल महिन्यात ४४ रुपये किलो, मे महिन्यात ४४ रुपये किलो, जून महिन्यात ४४ रुपये किलो, जुलै महिन्यात ४४ रुपये, किलो तर ऑगस्ट महिन्यात ४५ रुपये किलो दर आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये साखरेचे दर कसे आहेत, ते पाहुयात...
काल १६ ऑगस्ट रोजी दिल्ली मार्केटमध्ये ०४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल, कानपूर बाजारात ४ हजार ३८० रुपये प्रति क्विंटल, रायपूर बाजारात ०४ हजार ३५० रुपये, रांची बाजारात ०४ हजार ३५० रुपये, मुंबई बाजारात ४ हजार २३० रुपये, कोलकत्ता बाजारात ४ हजार ४६० रुपये, गुवाहाटी बाजारात ४ हजार ४६० रुपये, हैदराबाद बाजारात ०४ हजार २४० रुपये, तर चेन्नई बाजारात ४ हजार ४८० रुपये दर मिळाला.
सणांमुळे साखरेची मागणी वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील साखरेचे वाढते दर आणि देशातील उत्पादन स्थिती पाहता साखरेचे भाव वाढतील, अशी शक्यता आहे.
- सुनील पाटील, किराणा दुकानदार, पिंप्राळा