Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Update : सोयाबीन बाजारभावात मोठे चढ-उतार; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? वाचा सविस्तर

Soybean Market Update : सोयाबीन बाजारभावात मोठे चढ-उतार; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? वाचा सविस्तर

latest news Soybean Market Update: Big fluctuations in soybean market prices; Will farmers get relief? Read in detail | Soybean Market Update : सोयाबीन बाजारभावात मोठे चढ-उतार; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? वाचा सविस्तर

Soybean Market Update : सोयाबीन बाजारभावात मोठे चढ-उतार; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? वाचा सविस्तर

Soybean Market Update : सोयाबीनच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. शासकीय हस्तक्षेप आणि योग्य धोरणांच्या अभावामुळे दरात अनियंत्रित चढ-उतार होत आहेत. (Soybean Market Update)

Soybean Market Update : सोयाबीनच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. शासकीय हस्तक्षेप आणि योग्य धोरणांच्या अभावामुळे दरात अनियंत्रित चढ-उतार होत आहेत. (Soybean Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Market Update : सोयाबीनच्याबाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. शासकीय हस्तक्षेप आणि योग्य धोरणांच्या अभावामुळे दरात अनियंत्रित चढ-उतार होत आहेत. (Soybean Market Update)

शेतकऱ्यांना हवे असलेले योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना राबविल्या पाहिजेत.(Soybean Market Update)

वाशिम जिल्ह्यात अन्य शेतमालाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या सोयाबीनच्या प्रतिक्विंटल दरात यंदा मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत त्यात काहीअंशी सुधारणा झाली; परंतु सध्या पुन्हा दर गडगडले असून गेल्या दोन महिन्यांत सोयाबीनच्या प्रतिक्विंटल दरात तब्बल ५३० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. (Soybean Market Update)

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली!

बियाणे, खत, मजुरीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून सोयाबीनचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० दरम्यान येत आहे. मात्र, नफा तर दूरच; पण सोयाबीनचे दर हमीभावापर्यंतही पोहोचले नाही.

शासकीय उदासीनता; हस्तक्षेप नाहीच!

बाजार हस्तक्षेप योजनेचा अभाव असून व्यापाऱ्यांच्या मनमानीतून दरात होणारा चढ-उतार रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दरावर समाधान मानावे लागले.

अनेक शेतकरी पीक बदलाच्या विचारात!

दरवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनच्या पेरणीने व्यापलेले असते. मात्र, समाधानकारक दर मिळत नसल्याने सातत्याने नुकसान होत आहे. परिणामी, यंदा अनेक शेतकरी पीक बदलाच्या विचारात असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

सोयाबिनची आवक मंदावली

हिंगोली बाजारात आठवडाभरापासून सोयाबीनची आवक मंदावली आहे. शुक्रवारी(१३ जून) रोजी ६०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.

किमान ३ हजार ८५० ते कमाल ४ हजार ३५० रुपये एवढा भाव मिळाला. यंदा सोयाबीनचा भाव पडता राहिल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. सात महिने प्रतीक्षा करूनही भाववाढ झाली नसून, व्यापारीही भाववाढीची शाश्वती देत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणतः ४ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. त्यातील ७५ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले असते. त्यामुळे सोयाबीनचेच उत्पादन सर्वाधिक राहते. यंदाही ६० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

अशी होत गेली दरात घसरण!

३ एप्रिल २०२५४,३६०४,६००
५ मे २०२५४,१०५४,३००
११ जून २०२५३,८३०४,२९०

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : बाजारात सोयाबीनची आवक वाढली; पण दर 'जैसे थे'! वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Market Update: Big fluctuations in soybean market prices; Will farmers get relief? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.