Soybean Market : खरीप हंगामातील सोयाबीन अजून शेतातच असून त्याला किमान दोन महिने लागतील बाजारात येण्यासाठी. मात्र, त्याआधीच जुन्या सोयाबीनच्या दरात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. (Soybean Market)
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (३१ जुलै) रोजी सोयाबीनचे दर तब्बल ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.(Soybean Market)
सोयाबीन दरात सुधारणा
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अतिशय कमी दरांना सामोरे जावे लागले होते. मार्च ते मे महिन्यात दर ४ हजार रुपयांच्या खाली घसरले होते, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने साठवणूक केली होती. आता या साठवलेल्या सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसतोय.
कोठे किती दर मिळाला? (३१ जुलै रोजी)
बाजार समिती | सरासरी दर (रु. / क्विंटल) | कमाल दर (रु. / क्विंटल) |
---|---|---|
वाशिम | ४,३०० | ४,७०० |
कारंजा | ४,१५० | ४,६४० |
मानोरा | ४,२०० | ४,६३५ |
रिसोड | ४,०५० | ४,५८५ |
विशेष म्हणजे, वाशिम बाजार समितीत बुधवारी ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर नोंदविण्यात आला होता.
दरवाढीमागील प्रमुख कारणं
जागतिक स्तरावर मागणी वाढ झाली. खाद्यतेल व प्रोटीनचा मोठा वापर.
अमेरिकेतील साठा घटण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारावर परिणाम.
निर्यातीतील मर्यादा – काही देशांनी निर्यात थांबवली.
भारत सरकारकडून आयात धोरणातील बदल नाहीत – स्वदेशी उत्पादनावर परिणाम.
शेतकरी सध्या विक्रीपासून थांबलेले
दरवाढ होत असली तरी सध्या खरीप हंगामात तणनियंत्रण, कीडनियंत्रण व आंतरमशागत यामुळे शेतकरी बाजारात येणं कमी झाले आहे.
अधिक दरांची अपेक्षा असल्यामुळेही शेतकरी सोयाबीन विक्री टाळत आहेत. त्यामुळे आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे.
हंगामात झालेली निराशा अजूनही आठवते.
हंगामाआधी दर ४ हजार ७०० रुपये होते, पण हंगाम सुरू होताच मोठी घसरण झाली.
मार्च-मेमध्ये ४ हजार रुपयांच्या खाली दर गेले.
खर्चही निघत नव्हता; शेतकरी आर्थिक अडचणीत
सध्या शेतकऱ्यांनी साठवलेले जुने सोयाबीन चांगल्या दरात विकले जात आहे. पुढील काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, आयात-निर्यात धोरण आणि देशांतर्गत उत्पादन आढळल्यावरच दरवाढीची दिशा स्पष्ट होईल. दरवाढ कायम राहील की पुन्हा घसरेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : लातूर बाजारात सोयाबीनचा दर स्थिरच; आवक किती वाचा सविस्तर