Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत ४१०० रुपये प्रतिक्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.२ टक्के घट झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये (Soyabean Aavak) राष्ट्रीय पातळीवर ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत .४८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती ४११८ रुपये प्रति क्विंटल अशा सर्वाधिक होत्या.
तर अमरावती बाजारात सरासरी किंमती ३९७४ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्यातील निवडक बाजार समितीतील सरासरी किंमती पाहिल्या तर मध्यप्रदेशातील इंदोर बाजारात ०४ हजार ०५ रुपये अकोला बाजारात ०४ हजार ५५ रुपये तर लातूर बाजारात ०४ हजार १०० रुपये दर मिळाला. म्हणजेच मागील आठवड्यात सरासरी किंमती या ०४ हजार १०० रुपयांपर्यंत होत्या.
आजचे सोयाबीन बाजारभाव
आजचे सोयाबीन बाजारभाव पाहिले असता लातूर बाजारात ०४ हजार १२० रुपये जालना बाजारात ०४ हजार ५० रुपये, अकोला बाजारात ०४ हजार १०० रुपये, वाशिम बाजारात ०४ हजार २०० रुपये, जिंतूर बाजारात ०४ हजार ७५ रुपये, गेवराई बाजारात ०३ हजार ९०० रुपये, तासगाव बाजाराच्या ४८९२ रुपये तर काटोल बाजारात ०४ हजार ५० रुपये दर मिळाला.