Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : तीन वर्षांनी सोयाबीन पाच हजारी; अजून किती वाढणार भाव? वाचा सविस्तर

Soybean Market : तीन वर्षांनी सोयाबीन पाच हजारी; अजून किती वाढणार भाव? वाचा सविस्तर

latest news Soybean Market: Soybean price at Rs 5,000 after three years; How much more will the price increase? Read in detail | Soybean Market : तीन वर्षांनी सोयाबीन पाच हजारी; अजून किती वाढणार भाव? वाचा सविस्तर

Soybean Market : तीन वर्षांनी सोयाबीन पाच हजारी; अजून किती वाढणार भाव? वाचा सविस्तर

Soybean Market : तीन वर्षांनंतर सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे गेला आहे, मात्र भाव वाढेपर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांचा माल आधीच विकला गेला आहे. (Soybean Market)

Soybean Market : तीन वर्षांनंतर सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे गेला आहे, मात्र भाव वाढेपर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांचा माल आधीच विकला गेला आहे. (Soybean Market)

Soybean Market : जवळपास तीन ते साडेतीन वर्षांच्या दीर्घ मंदीनंतर राज्यात सोयाबीनच्याबाजारभावांनी मोठी झेप घेतली आहे.(Soybean Market)

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर थेट ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला असून, व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत हा दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.(Soybean Market)

मात्र, या भाववाढीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे.कारण ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपला माल आधीच विक्री केल्याचे सांगितले जात आहे.(Soybean Market)

अतिवृष्टीचा फटका, उत्पादन घटले

यंदा नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे हातून गेले, तर जे काही शिल्लक राहिले त्याला सुरुवातीच्या काळात अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी कमी दरातच माल विकण्याचा निर्णय घेतला.

आता बाजारात तेजी आली असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती विक्रीसाठी माल उरलेला नाही.

नाफेड व खासगी व्यापाऱ्यांचे दर

सध्या नाफेडकडून सोयाबीनची खरेदी ४ हजार ८५० ते ४ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे.

तर खासगी व्यापारी आणि तेल गिरण्या ५ हजार ते ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर देत आहेत.

दर्जेदार आणि कमी ओलाव्याच्या मालाला काही बाजार समित्यांमध्ये अधिक भाव मिळत असल्याचेही चित्र आहे.

नांदेड जिल्हा हा सोयाबीन लागवडीचा प्रमुख पट्टा असला, तरी यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात आवक कमी आहे.

तीन वर्षांनंतर पाच हजारांचा टप्पा

२०१९–२० नंतर प्रथमच सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील तीन वर्षे दर ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांदरम्यान अडकून होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. यंदा मात्र अचानक आलेल्या तेजीने बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

१५ दिवसांत ७०० ते ८०० रुपयांची वाढ

गेल्या पंधरा दिवसांत सोयाबीनच्या दरात तब्बल ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

डिसेंबर अखेरीस ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये असलेले दर थेट पाच हजारांच्या पुढे गेले आहेत. ही वाढ अत्यंत कमी कालावधीत झाल्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे.

भाववाढीमागची प्रमुख कारणे

तज्ज्ञांच्या मते, सोयाबीनच्या दरवाढीमागे अनेक कारणांचा एकत्रित परिणाम दिसून येत आहे.

* देशांतर्गत सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होणे

* तेल गिरण्यांची वाढलेली मागणी

* आयात तेलाच्या दरात होणारे चढ-उतार

* शेतकऱ्यांकडील माल जवळपास संपत येणे

* आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी

पुढील ८ ते १० दिवस तेजी कायम?

व्यापाऱ्यांच्या मते, पुढील ८ ते १० दिवस सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. 

बाजारात नवीन आवक अत्यल्प असून मागणी कायम असल्याने दर आणखी वाढू शकतात. काही व्यापारी ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव जाण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

७५ टक्के शेतकऱ्यांचा माल आधीच संपला

भाववाढीपूर्वीच आर्थिक गरजा, कर्जफेड आणि घरखर्चासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. सध्या केवळ २० ते २५ टक्के शेतकऱ्यांकडेच साठा शिल्लक असल्याने प्रत्यक्ष भाववाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार आहे.

साठेबाजांचे फावणार का?

शेतकऱ्यांकडील माल संपल्यानंतरही जर दर वाढत राहिले, तर यामागे साठेबाजीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा बाजारात सुरू आहे. 

दरवाढीचा फायदा साठेबाज आणि मोठे व्यापारी घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तीन वर्षांनी भाव चांगला मिळतोय, पण तो मिळेपर्यंत आमचा मालच संपला. भाव आधी वाढायला हवा होता. आता भाव वाढला, पण धान्य नाही.- रामचंद्र शिंदे, शेतकरी

तीन वर्षांनंतर सोयाबीनचे दर पाच हजारांच्या पुढे गेल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण असले, तरी बहुतांश शेतकऱ्यांसाठी ही तेजी उशिराने आलेली ठरली आहे. येत्या काही दिवसांत दर किती वाढतात आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : आवक घसरली अन् भाव वाढले; आज सोयाबीनला किती दर मिळतोय?

Web Title : सोयाबीन की कीमतें 3 साल बाद ₹5000 तक पहुंचीं; और कितनी बढ़ेंगी?

Web Summary : सोयाबीन की कीमतें तीन साल बाद ₹5000 तक पहुंचीं, लेकिन अधिकांश किसानों ने पहले ही अपना स्टॉक बेच दिया। कम उत्पादन और बढ़ी हुई मांग से कीमतों में वृद्धि हुई है, और आगे भी बढ़ने की संभावना है। केवल 20-25% किसानों को लाभ होगा।

Web Title : Soybean Prices Hit ₹5000 After 3 Years; How High Will They Go?

Web Summary : Soybean prices surge to ₹5000 after three years, but most farmers already sold their stock. Reduced production and increased demand fuel the rise, with potential for further gains. Only 20-25% farmers will benefit.