Soybean Market : दोन वर्षांपासून कमी भावामुळे त्रस्त असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे आता माल उरलेला नाही आणि याच काळात बाजारात दरवाढ सुरू झाली आहे. (Soybean Market)
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात सध्या सोयाबीनला क्विंटलमागे ४ हजार ३०० ते ४ हजार २०० भाव मिळत असून, गेल्या आठवड्यात दरात २०० ते ३०० रुपये इतकी वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ शेतकऱ्यांच्या हाती न लागता थेट व्यापाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. (Soybean Market)
मागील दोन वर्षांची निराशा
सोयाबीन हे नगदी पीक असूनही, गेली दोन ते तीन वर्षे खरीप हंगामात अतिवृष्टी, उघडीप अशा नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे. उत्पादन घटल्यावरही बाजारभाव समाधानकारक मिळाला नाही. (Soybean Market)
यंदाही जुलैअखेर सोयाबीनचा दर कमाल ४ हजार ५०० पर्यंतच पोहोचला. भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी महिनाभर साठवून ठेवलेले सोयाबीन अखेर कमी भावात विकावे लागले.(Soybean Market)
भाववाढीची कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन व सोया तेलाच्या किमती वाढ
प्रमुख उत्पादक भागांतील कमी उत्पादन
वाहतुकीतील अडचणींमुळे जागतिक स्तरावर पुरवठा घट
सोया तेलाच्या मागणीत वाढ
या घटकांमुळे स्थानिक बाजारातही किमती वाढल्या आहेत.
हमीभाव व अपेक्षा
२०२४-२५ खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार ३२८ ठरवला असून, यात गतवर्षीपेक्षा ४३६ रुपयांची वाढ आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा मोंढ्यात किमान ५ हजार ते ₹५ हजार ५०० दर मिळणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा कमी दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरतील.
नाफेडऐवजी खासगी बाजाराची निवड
यंदा नाफेड केंद्रावर विक्री करताना शेतकऱ्यांना अपुरा बारदाणा, दोन-तीन दिवस मुक्काम, आणि पैशासाठी प्रतीक्षा अशा अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांनी खासगी व्यापाऱ्यांकडेच माल विकणे पसंत केले.
उत्पादन खर्चात वाढ
खत, बियाणे, मजुरी या सर्व बाबींमध्ये खर्च वाढला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन घट आणि कमी भाव या दुहेरी संकटामुळे लागवड खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : दीड वर्षानंतर सोयाबीन दरात झपाट्याने वाढ; वाचा काय मिळतोय भाव