Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean prices rise; Highest price received in Ahampur Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारपेठेत आज (३ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची चांगली आवक (Soybean Arrival) झाली. अहमपूरमध्ये सर्वाधिक ४ हजार ५२२ रुपये दर मिळाला तर मुरुममध्ये केवळ २ हजार ३०० रुपये भाव नोंदवला गेला. यंदा पिवळ्या सोयाबीनला जास्त मागणी असून, दरांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक झाली. एकूण ४ हजार ५९२ क्विंटल आवक नोंदवली गेली असून, सरासरी दर ३ हजार ९४९ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला. बाजारात पांढरा, लोकल व पिवळा अशा जातींची विक्री झाली. (Soybean Arrival)

आवक व दरांची स्थिती

जास्त आवक असलेले बाजार

अमरावती – ९७२ क्विंटल (लोकल)

मलकापूर – ९६१ क्विंटल (पिवळा)

तुळजापूर – २५४ क्विंटल (डॅमेज)

औराद शहाजानी – १९७ क्विंटल (पिवळा)

अहमपूर – १८४ क्विंटल (पिवळा)

कमी आवक असलेले बाजार

छत्रपती संभाजीनगर – १ क्विंटल (लोकल)

सावनेर – २ क्विंटल (पिवळा)

उमरगा – ५ क्विंटल (पिवळा)

यवतमाळ – ४ क्विंटल (पिवळा)

दरातील चढ-उतार

किमान दर : मुरुम बाजारात २ हजार ३०० रुपये/क्विंटल (पिवळा)

कमाल दर : अहमपूर येथे ४ हजार ५२२ रुपये/क्विंटल (पिवळा)

सर्वसाधारण दर : ३ हजार ९४९ रुपये/क्विंटल

कोणत्या जातीला मागणी?

पिवळ्या सोयाबीनला जास्त मागणी दिसून आली. अहमपूर, अकोला, मुर्तीजापूर, सेनगाव आदी बाजारात ४ हजार ३०० ते ४ हजार ५२२ रुपयांचा दर मिळाला.

लोकल सोयाबीन अमरावती, सोलापूर, नागपूर, जळगाव येथे ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपये दराने विकली गेली.

डॅमेज सोयाबीन तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात आली व तिला ४ हजार ३०० रुपये दर मिळाला.

आवकेत घट

काही बाजारांमध्ये आवक अपेक्षेपेक्षा कमी दिसली. जसे की छत्रपती संभाजीनगर, सावनेर, उमरगा, यवतमाळ येथे प्रतीकात्मक आवक झाली. पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2025
जळगाव - मसावत---क्विंटल5300030003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1415041504150
तुळजापूरडॅमेजक्विंटल254430043004300
सोलापूरलोकलक्विंटल369295045004200
अमरावतीलोकलक्विंटल972410044004250
जळगावलोकलक्विंटल349300042504200
नागपूरलोकलक्विंटल31400041614120
हिंगोलीलोकलक्विंटल100380043004050
मेहकरलोकलक्विंटल150380043954250
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल26409943304281
अकोलापिवळाक्विंटल208370044904300
यवतमाळपिवळाक्विंटल4420542054205
चिखलीपिवळाक्विंटल60375044604105
बीडपिवळाक्विंटल133259543403773
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल100350042503875
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल60412043104215
मलकापूरपिवळाक्विंटल961300041053630
सावनेरपिवळाक्विंटल2400040004000
देउळगाव राजापिवळाक्विंटल13260039003475
मंठापिवळाक्विंटल121300038503501
अहमहपूरपिवळाक्विंटल184380145224341
औराद शहाजानीपिवळाक्विंटल197345044123931
मुरुमपिवळाक्विंटल44230036003038
उमरगापिवळाक्विंटल5365136513651
सेनगावपिवळाक्विंटल61405043004225
बुलढाणापिवळाक्विंटल120360042003900
नेर परसोपंतपिवळाक्विंटल62200542653647

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Zendu Flower Market : अतिवृष्टीतही झेंडूची टवटवीत आवक; मात्र भावात चढ-उतार वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में उछाल: अहमदनगर में सबसे ज्यादा दर, विवरण अंदर

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की आवक में अलग-अलग दरें देखी गईं। अहमदनगर में पीली सोयाबीन के लिए ₹4,522/क्विंटल के साथ अग्रणी। कुल मिलाकर, 4,592 क्विंटल की आवक हुई, जिसका औसत ₹3,949 था। पीली सोयाबीन की मांग अधिक है, जबकि बारिश से कुछ बाजारों में आवक प्रभावित हुई है।

Web Title : Soybean Prices Surge: Highest Rate in Ahmedpur, Details Inside

Web Summary : Soybean arrivals see varied rates across Maharashtra markets. Ahmedpur leads with ₹4,522/quintal for yellow soybean. Overall, 4,592 quintals arrived, averaging ₹3,949. Yellow soybean is in high demand, while rain has impacted arrivals in some markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.