Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; 'या' बाजारात दर ५,५०० पार वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; 'या' बाजारात दर ५,५०० पार वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean prices rise again; 'these' market rates 5,500 paise Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; 'या' बाजारात दर ५,५०० पार वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; 'या' बाजारात दर ५,५०० पार वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा चैतन्य दिसू लागले आहे.

काही प्रमुख बाजारांत आवक (Soybean Arrival) मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही, दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, सर्वच बाजारांत एकसारखे दर नसून, कुठे भाव वधारले आणि कुठे दबाव आहे.

राज्यात आज (२१ जानेवारी) रोजी सुमारे २६ हजार ७८० क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली असून सरासरी बाजारभाव सुमारे ४ हजार ९८७ रुपये प्रतिक्विंटल राहिला.

सर्वाधिक आवक कुठे?

कारंजा बाजार समितीत सर्वाधिक ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याखालोखाल

अमरावती – ५ हजार ८०८ क्विंटल,

अकोला – ५ हजार ७०९ क्विंटल,

नागपूर – १ हजार ४५ क्विंटल,

हिंगोली – १ हजार क्विंटल,

माजलगाव – १ हजार २७ क्विंटल

अशी लक्षणीय आवक नोंदवली गेली.

दर कुठे वधारले?

मर्यादित आवक आणि दर्जेदार मालामुळे काही बाजारांत सोयाबीनचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले.

यवतमाळ येथे पिवळ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल स्थिर दर मिळाला.

पिंपळगाव (ब) – औरंगपूर भेंडाळी येथे दर ५ हजार ४०० रुपये राहिले.

सावनेर बाजारात दर ५ हजार ३७० ते ५ हजार ३८० रुपये नोंदवले गेले.

अकोला येथे सरासरी दर ५ हजार १९० रुपये,

पुसद येथे ५ हजार १८० रुपये,

परतूर येथे ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

दर कमी कुठे?

काही ठिकाणी आवक जास्त किंवा मालाचा दर्जा कमी असल्याने दरावर परिणाम झाला.

काटोल बाजारात किमान दर ३ हजार ४०० रुपये,

सोलापूर (लोकल) येथे किमान ३ हजार ७०० रुपये,

भद्रावती येथे दर ४ हजार रुपये,

आष्टी (वर्धा) येथे सरासरी ४ हजार ५०० रुपये इतके राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2026
माजलगाव---क्विंटल1027410052755100
चंद्रपूर---क्विंटल18479048904800
पुसद---क्विंटल415478552205180
कारंजा---क्विंटल6000472552105060
तुळजापूर---क्विंटल450520052005200
राहता---क्विंटल8505051415100
धुळेहायब्रीडक्विंटल15400047004475
सोलापूरलोकलक्विंटल105370053105275
अमरावतीलोकलक्विंटल5808480052255012
नागपूरलोकलक्विंटल1045440052515038
हिंगोलीलोकलक्विंटल1000480053005050
अकोलापिवळाक्विंटल5709490053255190
यवतमाळपिवळाक्विंटल1443550055005500
पैठणपिवळाक्विंटल9479148514800
भोकरपिवळाक्विंटल82435151414746
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल640460052554930
सावनेरपिवळाक्विंटल25535053805370
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल5540054005400
परतूरपिवळाक्विंटल61503152815200
नांदगावपिवळाक्विंटल34458052005150
गंगापूरपिवळाक्विंटल3496149614961
अहमहपूरपिवळाक्विंटल1216400052885091
मुरुमपिवळाक्विंटल125465051254976
बुलढाणापिवळाक्विंटल90480052005000
उमरखेडपिवळाक्विंटल450480049504900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120480049504900
राजूरापिवळाक्विंटल75475051505025
भद्रावतीपिवळाक्विंटल6400040004000
काटोलपिवळाक्विंटल349340050514850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल8400052054500
पुलगावपिवळाक्विंटल105405051254950
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल334385051004850

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; 'या' बाजारात भावाने गाठला उच्चांक वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में फिर उछाल; बाजार दर ₹5,500 पार

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतें बढ़ रही हैं। कुछ बाजारों में अच्छी गुणवत्ता वाले सोयाबीन की कीमत ₹5,500/क्विंटल तक है। करंजा बाजार में सबसे अधिक आवक दर्ज की गई। यवतमाल में सर्वोत्तम गुणवत्ता वाले सोयाबीन के लिए ₹5,500/क्विंटल दर्ज किया गया। कीमतें गुणवत्ता और बाजार की मांग के आधार पर भिन्न होती हैं।

Web Title : Soybean Prices Surge Again; Market Rates Cross ₹5,500

Web Summary : Soybean prices are rising in Maharashtra markets. Quality soybeans fetch up to ₹5,500/quintal in some markets. The highest arrival was recorded in Karanja market. Yavatmal recorded ₹5,500/quintal for best quality Soybean. Prices vary based on quality and market demand.