Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे दर 'या' बाजारात उसळले वाचा सविस्तर बातमी

Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे दर 'या' बाजारात उसळले वाचा सविस्तर बातमी

latest news Soybean Bajar Bhav: Soybean prices have surged in the market. Read the detailed news. | Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे दर 'या' बाजारात उसळले वाचा सविस्तर बातमी

Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे दर 'या' बाजारात उसळले वाचा सविस्तर बातमी

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीन बाजारात आज अचानक तेजी पाहायला मिळाली. आवक (Soybean Arrivals) घटताच दरांनी उसळी घेतली असून काही बाजारांत थेट ६ हजार रुपयांचा टप्पा पार करण्यात आला आहे. कुठे मागणी वाढली आणि कुठे आवक कमी झाली, पाहूया सविस्तर…

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीन बाजारात आज अचानक तेजी पाहायला मिळाली. आवक (Soybean Arrivals) घटताच दरांनी उसळी घेतली असून काही बाजारांत थेट ६ हजार रुपयांचा टप्पा पार करण्यात आला आहे. कुठे मागणी वाढली आणि कुठे आवक कमी झाली, पाहूया सविस्तर…

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज (२८ जानेवारी) मिश्र स्थिती पाहायला मिळाली.काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चांगली मागणी राहिल्याने दरात तेजी दिसून आली, तर काही ठिकाणी आवक (Soybean Arrivals) घटल्यामुळे व्यवहार मर्यादित राहिले.

सोयाबीनचे सरासरी दर ५ हजार १०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावल्याचे चित्र आहे.

एकूण आवक किती?

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मिळून १३,६७९ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक काहीशी कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कुठे होती जोरदार मागणी?

राज्यातील विदर्भातील बाजारांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक मागणी पाहायला मिळाली.

अमरावती : सर्वाधिक ४,७९४ क्विंटल आवक; सरासरी दर ५,२७८ रुपये

अकोला : ३,९०२ क्विंटल आवक; पिवळ्या सोयाबीनला ५,५७० रुपये सरासरी दर

यवतमाळ : मर्यादित आवक असूनही थेट ६,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला

हिंगोली : ६०० क्विंटल आवक; सरासरी दर ५,५०० रुपये

देवणी : उच्च प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला ५,७१० रुपये सरासरी दर

या बाजारांमध्ये तेलगिरणी व व्यापाऱ्यांची सक्रिय खरेदी असल्याने दराला आधार मिळाला.

कुठे आवक घटली?

काही बाजारांमध्ये आवक अत्यल्प राहिल्याने व्यवहार मर्यादित झाले.

अहिल्यानगर : केवळ १४ क्विंटल आवक

सावनेर : फक्त १० क्विंटल

नांदगाव : ३० क्विंटल

सिन्नर : २५ क्विंटल

या बाजारांमध्ये शेतकऱ्यांनी दर वाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरल्याचे चित्र आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2026
अहिल्यानगर---क्विंटल14500053005150
लासलगाव - विंचूर---क्विंटल464300057505600
चंद्रपूर---क्विंटल103500056105400
सिन्नर---क्विंटल25500056555640
अमरावतीलोकलक्विंटल4794500055565278
नागपूरलोकलक्विंटल356499053805185
हिंगोलीलोकलक्विंटल600525057505500
अकोलापिवळाक्विंटल3902534057005570
यवतमाळपिवळाक्विंटल790600060006000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल900533056505490
सावनेरपिवळाक्विंटल10533056505500
नांदगावपिवळाक्विंटल30532856185618
बाभुळगावपिवळाक्विंटल1000430157755551
काटोलपिवळाक्विंटल263532855855350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल332533558005460
देवणीपिवळाक्विंटल96560058215710

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; पिवळ्या जातीला इतक्या हजार रुपयांचा दर वाचा सविस्तर

Web Title : चुनिंदा बाजारों में सोयाबीन की कीमतों में उछाल: विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतों में मिला-जुला रुख रहा। विदर्भ के कुछ बाजारों में मांग और कीमतों में वृद्धि देखी गई, यवतमाल में ₹6,000/क्विंटल तक पहुंचा। कुल आवक थोड़ी कम रही। कुछ बाजारों में किसानों द्वारा स्टॉक रोकने के कारण सीमित लेनदेन हुआ, क्योंकि उन्हें कीमतों में और वृद्धि की उम्मीद है।

Web Title : Soybean Prices Surge in Select Markets: Detailed Report

Web Summary : Soybean prices showed mixed trends across Maharashtra markets. Select markets, particularly in Vidarbha, saw increased demand and rising prices, with Yavatmal reaching ₹6,000/quintal. Overall arrivals were slightly down. Some markets saw limited transactions due to farmers holding stock, anticipating further price increases.