Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; आवक घटली वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; आवक घटली वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean prices fluctuate; arrivals decrease Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; आवक घटली वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; आवक घटली वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (१७ डिसेंबर) रोजी सोयाबीनच्या दरात संमिश्र चढ-उतार पाहायला मिळाली. एकूण आवक (Soybean Arrival) सुमारे २६ हजार २७५ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली.  

मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक घटल्याचे चित्र आहे. आवक (Soybean Arrival) कमी झाल्याने काही बाजारांत दरांना आधार मिळाला, तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांची मर्यादित खरेदी दिसून आली.

आवकेत घट

बाजारात सध्या हमीभावाने खरेदी केंद्र सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी माल रोखून धरत असल्याने आवक अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. विशेषतः अकोला, अमरावती, अहमहपूर, चिखली, मंगरुळपीर या बाजारांत तुलनेने जास्त आवक दिसली, मात्र इतर बाजारांत आवक मर्यादित राहिली.

पिवळ्या सोयाबीनला जास्त मागणी

आज पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले. अकोला, यवतमाळ, हिंगोली, चिखली, जिंतूर, बुलढाणा, सिंदी (सेलू) या बाजारांत पिवळ्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळाला. दर्जेदार व ओलसरपणा कमी असलेल्या मालाला व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिले.

दरात ठिकठिकाणी चढ-उतार

सोयाबीनचे दर आज ३ हजार ७०० रुपयांपासून थेट ५ हजार ७५० रुपयांपर्यंत नोंदविण्यात आले.

उच्चांकी दर मंगरुळपीर येथे ५ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

कोरेगाव व किनवट येथे हमीभावाप्रमाणे ५ हजार ३२८ रुपये दर नोंदविला गेला.

सर्वसाधारण दर बहुतांश बाजारांत ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.

या बाजारात कमी दर 

जळगाव–मसावत, माजलगाव, पिंपळगाव परिसरात काही ठिकाणी ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये दर नोंदविले गेले.

दर वाढले की घटले?

एकंदर पाहता आज सोयाबीनच्या दरात मोठी घसरण दिसून आली नाही, मात्र दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असताना, ओलसर किंवा हलक्या प्रतीच्या मालाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याचे चित्र आहे.

आजचा सरासरी बाजारभाव सुमारे ४ हजार ३४२ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हमीभावाच्या तुलनेत अजूनही कमी दरात विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. मात्र, आवक कमी राहिल्यास आणि हमीभाव खरेदी केंद्रांची अंमलबजावणी प्रभावी झाल्यास पुढील काळात दरांना आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/12/2025
जळगाव - मसावत---क्विंटल3370037003700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17425044004325
माजलगाव---क्विंटल1064350045004000
चंद्रपूर---क्विंटल21394543454090
राहूरी -वांबोरी---क्विंटल5445244754463
सेलु---क्विंटल51424144674400
कोरेगाव---क्विंटल126532853285328
सोलापूरलोकलक्विंटल99380045204300
अमरावतीलोकलक्विंटल5112390043004100
हिंगोलीलोकलक्विंटल1050400045004250
अकोलापिवळाक्विंटल3659400047704400
यवतमाळपिवळाक्विंटल1014400046054302
मालेगावपिवळाक्विंटल2439943994399
चिखलीपिवळाक्विंटल2259380047004250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल217385043504100
जिंतूरपिवळाक्विंटल469390046814500
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल1350136003550
वरूडपिवळाक्विंटल148215045354099
नांदगावपिवळाक्विंटल32439043934390
अहमहपूरपिवळाक्विंटल5565320046414406
औराद शहाजानीपिवळाक्विंटल554400045814290
किनवटपिवळाक्विंटल128532853285328
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40410044004200
मुरुमपिवळाक्विंटल124350044114141
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1688380057505750
बुलढाणापिवळाक्विंटल150400043114155
बाभुळगावपिवळाक्विंटल1600350147154201
राजूरापिवळाक्विंटल108320042454170
काटोलपिवळाक्विंटल173340045304250
पुलगावपिवळाक्विंटल46340046004300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल750350046004450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढली; कुठे भाव वधारले? वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव; आवक घटी, विस्तृत रिपोर्ट यहाँ

Web Summary : महाराष्ट्र की कृषि मंडियों में सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। आवक घटकर लगभग 26,275 क्विंटल रही। पीले सोयाबीन की मांग अधिक रही, कीमतें ₹3,700 से ₹5,750 प्रति क्विंटल तक रहीं। औसत मूल्य ₹4,342 के आसपास रहा। किसान बेहतर दरों के लिए सरकारी खरीद केंद्रों का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Soybean Prices Fluctuate; Arrivals Decrease, Detailed Report Here

Web Summary : Soybean prices saw mixed trends across Maharashtra's agricultural markets. Arrivals decreased to approximately 26,275 quintals. Yellow soybean saw high demand, with prices ranging from ₹3,700 to ₹5,750 per quintal. Average price remained around ₹4,342. Farmers await government procurement centers for better rates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.