Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज (१४ डिसेंबर) रोजी आवक (Soybean Arrivals) तुलनेने कमी राहिल्याचे चित्र दिसून आले.
बुलढाणा, काटोल व देवणी या प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिळून एकूण ६६९ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) नोंदविण्यात आली. आवक मर्यादित असल्याने काही बाजारांत कमाल दरांना आधार मिळाल्याचे दिसून आले.
बाजारनिहाय आवक व दर
बुलढाणा बाजार समितीमध्ये ४०० क्विंटल आवक झाली. किमान दर ३ हजार ८०० रुपये, कमाल दर ४ हजार २५० रुपये तर सर्वसाधारण दर ४हजार २५ रुपये प्रतिक्विंटल राहिला.
काटोल बाजार समितीमध्ये २०२ क्विंटल आवक झाली. येथे दरात मोठी तफावत दिसून आली. किमान दर ३ हजार रुपये, कमाल दर ४ हजार ५६५ रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार २५० रुपये नोंदविण्यात आला.
देवणी बाजार समितीमध्ये केवळ ६७ क्विंटल इतकी कमी आवक झाली. मात्र, दर चांगले राहिले. किमान दर ४ हजार रुपये, कमाल दर ४ हजार ६३९ रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
किती घट झाली?
प्रमुख बाजारांत सोयाबीनची आवक कमी राहिली, त्यामुळे एकूण आवकेत मोठी घट जाणवली.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 14/12/2025 | ||||||
| बुलढाणा | पिवळा | क्विंटल | 400 | 3800 | 4250 | 4025 |
| काटोल | पिवळा | क्विंटल | 202 | 3000 | 4565 | 4250 |
| देवणी | पिवळा | क्विंटल | 67 | 4000 | 4639 | 4320 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
