Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढतेय; दर्जेदार मालाला चांगला दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढतेय; दर्जेदार मालाला चांगला दर वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean arrivals are increasing in the market; Good prices for quality goods Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढतेय; दर्जेदार मालाला चांगला दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढतेय; दर्जेदार मालाला चांगला दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) हळू हळू वाढत असतानाही दरांमध्ये मोठी घसरण झाली नाही. आज (१९ डिसेंबर) एकूण २४ हजार ६१६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, पिवळ्या व दर्जेदार मालाला चांगले दर मिळाले. (Soybean Arrival)

काही बाजारांत प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Soybean Arrival)

कोणत्या बाजारात किती दर?

जळगाव बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. यवतमाळ बाजारात कमाल ४ हजार ९०५ रुपये, तर वाशीममध्ये ५ हजार २०० रुपये कमाल दर नोंदविण्यात आला. रिसोड, ताडकळस, अकोला, सिन्नर, लासलगाव-निफाड या बाजारांमध्येही ४ हजार ५०० रुपयांच्या आसपास दर मिळाले.

पिवळ्या सोयाबीनला अधिक मागणी

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र होते. अकोला, यवतमाळ, वाशीम, चिखली, हिंगणघाट, बाभुळगाव, काटोल, सिंदी (सेलू) या बाजारांमध्ये पिवळ्या जातीची मोठी आवक झाली. मात्र दर्जेदार मालालाच चांगले दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल व नं.१ जातीला स्थिर दर

अमरावती, नागपूर, जळगाव (लोकल) या बाजारांमध्ये लोकल सोयाबीनला ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये दर मिळाले. ताडकळस बाजारात नं. १ प्रतीच्या सोयाबीनला ४ हजार ६५० रुपये कमाल दर मिळाल्याने या जातीला मागणी कायम असल्याचे स्पष्ट झाले.

आवक वाढली तरी दर स्थिर

आज काही बाजारांमध्ये आवक वाढली असली तरी दरात मोठी घसरण झाली नाही. रिसोड (२,२०० क्विंटल), अमरावती (५,२३८ क्विंटल), ताडकळस (३,२०० क्विंटल), अकोला (३,३७७ क्विंटल), वाशीम (२,४०० क्विंटल) या बाजारांमध्ये मोठी आवक नोंदवली गेली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2025
जळगाव---क्विंटल224532853285328
चंद्रपूर---क्विंटल64350045254350
सिन्नर---क्विंटल36428045554500
रिसोड---क्विंटल2200439546854550
अमरावतीलोकलक्विंटल5238400044004200
जळगावलोकलक्विंटल46435045004500
नागपूरलोकलक्विंटल592380045504362
ताडकळसनं. १क्विंटल3200420046504550
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल146311345844531
अकोलापिवळाक्विंटल3377400046104500
यवतमाळपिवळाक्विंटल709400049054452
चिखलीपिवळाक्विंटल1900370047314215
हिंगणघाटपिवळाक्विंटल1692320047553800
वाशीमपिवळाक्विंटल2400400052004500
पैठणपिवळाक्विंटल4390039003900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल241405045004275
जामखेडपिवळाक्विंटल284380044004100
नांदगावपिवळाक्विंटल20440044714450
बाभुळगावपिवळाक्विंटल1350350147904201
राजूरापिवळाक्विंटल82378543404195
काटोलपिवळाक्विंटल509335046654450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल302355046004450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Soybean Seed Market : बीजवाई सोयाबीनच्या दरात अवघ्या १८ दिवसांत हजारोंची घट वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: आवक बढ़ी, गुणवत्ता वाले उत्पादों के लिए अच्छे दाम

Web Summary : महाराष्ट्र के कृषि बाजारों में सोयाबीन की आवक बढ़ रही है, फिर भी कीमतें स्थिर हैं। जलगांव में गुणवत्ता वाले सोयाबीन की कीमत ₹5,328/क्विंटल तक है। पीले सोयाबीन की मांग अधिक है। कुछ बाजारों में आवक बढ़ने के बावजूद, कीमतों में ज्यादा गिरावट नहीं आई है, जिससे किसानों को राहत मिली है।

Web Title : Soybean Market: Arrivals Increase, Good Prices for Quality Produce

Web Summary : Soybean arrivals are increasing in Maharashtra's agricultural markets, yet prices remain stable. Quality soybeans fetch up to ₹5,328/quintal in Jalgaon. Yellow soybeans are in high demand. While arrivals have increased in some markets, prices haven't significantly declined, offering relief to farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.