Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : दर्यापूरसह वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी आवक; बाजारभाव कसा मिळाला वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दर्यापूरसह वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी आवक; बाजारभाव कसा मिळाला वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Record arrival of soybeans in Washim district including Daryapur; Read in detail how the market price was obtained | Soybean Bajar Bhav : दर्यापूरसह वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी आवक; बाजारभाव कसा मिळाला वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दर्यापूरसह वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी आवक; बाजारभाव कसा मिळाला वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक (Soybean Arrivals) सुरू असून दर्यापूर, वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. मात्र आवक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे. वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक (Soybean Arrivals) सुरू असून दर्यापूर, वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. मात्र आवक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे. वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दिवाळी सणानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक (Soybean Arrivals) होत आहे. (Soybean Bajar Bhav)

दर्यापूर, कारंजा, वाशिम, रिसोड आदी बाजारपेठांमध्ये दररोज हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत असून, शेतकरी आपल्या मालाच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होत आहेत. मात्र, आवक वाढल्यामुळे दरात घट दिसून येत असून शेतकरी चिंतेत आहेत.(Soybean Bajar Bhav)

सध्या दर सरासरी ३,७५० ते ४,२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत. ओलसरतेचा परिणाम आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यात अडचणी येत असून नाफेड खरेदी सुरू झाल्याने काही दिवसांत आवक घटण्याची शक्यता आहे.(Soybean Bajar Bhav)

दर्यापूर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक

दर्यापूर बाजार समितीत सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असून, गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची नोंद होत आहे. 

सध्या सरासरी ३,७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्य सरकारने निश्चित केलेला हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल असला तरी बाजारभाव सध्या ३,९०० ते ४,२५० रुपये दरम्यान आहे.

पावसाचा परिणाम आणि ओलसरता वाढली 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतमालात ओलसरतेचे प्रमाण वाढले असून मालाचा दर्जा घटला आहे. परिणामी बाजारभावात घसरण होत आहे. काही ठिकाणी माल विक्रीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मोजणी व निपटाऱ्यासाठी बाजार समित्यांमध्ये प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यात १ लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक

वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यातच १ लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन बाजारात आले आहे. १ नोव्हेंबर रोजी केवळ तीनच बाजार समित्यांमध्ये कारंजा, वाशिम आणि रिसोड मिळून २८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक नोंद झाली.

कारंजा बाजार समितीत : १४ हजार क्विंटल

वाशिम बाजार समितीत : १०,१०० क्विंटल

रिसोड बाजार समितीत : ३,५०० क्विंटल

आवक वाढली पण दर घटले

दिवाळीनंतर सुरुवातीला सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा दिसून आली होती. कारंजा बाजार समितीत सोमवारी ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र, आवक वाढल्यानंतर शनिवारी दर घसरून ४,०७५ ते ४,४७५ रुपये प्रति क्विंटल इतका झाला. 

वाशिममध्ये कमाल दर ४,३७० रुपये, तर किमान दर ३,९०० रुपये राहिला.

नाफेड खरेदीमुळे बदलाची शक्यता

दरात सतत घट होत असल्याने अनेक शेतकरी आता नाफेडकडे वळत आहेत. जिल्ह्यात नाफेडद्वारे सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत बाजार समित्यांमधील आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, आर्थिक गरजेमुळे काही शेतकरी तातडीच्या खर्चासाठी बाजार समित्यांमध्येच माल विकत आहेत.

शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी

अल्पदरामुळे शेतकरी नाराज आहेत. गुणवत्तेनुसार दर देण्यात यावा आणि बाजारभाव हमीभावाच्या जवळ आणावा, अशी मागणी कास्तकार वर्गातून केली जात आहे. हवामान स्थिर राहिल्यास आणि नाफेडकडून जलद खरेदी सुरू झाल्यास सोयाबीन दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच माल विक्रीसाठी आणावा. सध्या ओलसरतेमुळे मालाची गुणवत्ता घसरत आहे आणि त्याचा थेट परिणाम दरावर होत आहे.- सुनील गावंडे, सभापती, दर्यापूर बाजार समिती

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

Web Title : वाशिम में सोयाबीन की आवक बढ़ी; दिवाली के बाद कीमतों में उतार-चढ़ाव

Web Summary : दिवाली के बाद वाशिम जिले में सोयाबीन की रिकॉर्ड आवक से कीमतें प्रभावित। आपूर्ति बढ़ने से दरें ₹3,750-₹4,250/क्विंटल तक गिरीं। नमी और अनिश्चित बारिश से गुणवत्ता प्रभावित। नाफेड की खरीद से बाजार स्थिर होने की उम्मीद है।

Web Title : Soybean Arrival Surge in Washim; Prices Fluctuate Post-Diwali

Web Summary : Washim district sees record soybean arrivals post-Diwali, impacting prices. Increased supply lowers rates to ₹3,750-₹4,250/quintal. Moisture and uncertain rains affect quality. NAFED purchases may stabilize market soon, offering hope to farmers seeking better prices.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.