Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचे कसे आहेत दर जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचे कसे आहेत दर जाणून घ्या सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Know the prices of soybeans in Vidarbha-Marathwada in detail | Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचे कसे आहेत दर जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचे कसे आहेत दर जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये आज (१३ डिसेंबर) रोजी संमिश्र चित्र पाहायला मिळाले. (Soybean Arrival) 

काही प्रमुख बाजारांतसोयाबीनला समाधानकारक दर मिळाले असले, तरी अनेक ठिकाणी दरांमध्ये चढ-उतार कायम असल्याचे दिसून आले आहे. एकूण आवक १९ हजार ९४ क्विंटल इतकी नोंदवली गेली असून सरासरी दर ४ हजार २८३ रुपये प्रति क्विंटल राहिला आहे. (Soybean Arrival) 

कुठे किती दर मिळाला?

चंद्रपूर बाजार समितीत ६७ क्विंटल आवकेसह किमान ३ हजार ते कमाल ४ हजार २४५ रुपये दर मिळाला असून सरासरी दर ३ हजार ६९५ रुपये राहिला. अचलपूर येथे ७० क्विंटल आवकेसह सोयाबीनला ३ हजार ६०० ते ४ हजार ४०० रुपये दर मिळत सरासरी ४ हजार रुपये दर नोंदवला गेला.

श्रीरामपूर बाजारात सोयाबीनचे दर तुलनेने स्थिर राहिले असून ४ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपये दराने व्यवहार झाले. कोरेगाव बाजार समितीत सोयाबीनला थेट ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल असा उच्चांक मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात भाव कसे?

अमरावती बाजारात ४ हजार २४५ क्विंटल इतकी मोठी आवक नोंदवली गेली असून येथे सरासरी दर ४ हजार १७५ रुपये राहिला. नागपूर बाजारात १०२१ क्विंटल आवकेसह कमाल ४ हजार ५०० रुपये दर मिळाला असून सरासरी दर ४ हजार ३२५ रुपये नोंदवला गेला.

अकोला बाजार समितीत ५,२६५ क्विंटल आवकेसह पिवळ्या सोयाबीनला ४००० ते ४ हजार ५०० रुपये दर मिळाला असून सरासरी दर ४ हजार ४५० रुपये राहिला. वाशीम-अनसींग, जिंतूर, बोरी-अरब, किनवट, औराद शहाजानी या बाजारांतही सरासरी दर ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या आसपास राहिले.

काही ठिकाणी घसरण कायम

मालेगाव बाजारात कमी आवकेमुळे दरात अस्थिरता दिसून आली असून सरासरी दर ४ हजार १३९ रुपये राहिला. बाभुळगाव येथे किमान दर ३ हजार ५०१ रुपये इतका नोंदवला गेला, तर कमाल दर ४ हजार ७५० रुपये मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात / प्रतपरिमाणआवक (क्विंटल)किमान दर (₹)कमाल दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
13/12/2025      
चंद्रपूर---क्विंटल67300042453695
अचलपूर---क्विंटल70360044004000
श्रीरामपूर---क्विंटल30420044004300
कोरेगाव---क्विंटल225532853285328
तुळजापूर---क्विंटल125435043504350
सोलापूरलोकलक्विंटल101390044504300
अमरावतीलोकलक्विंटल4245390044504175
नागपूरलोकलक्विंटल1021380045004325
हिंगोलीलोकलक्विंटल780395044504200
अकोलापिवळाक्विंटल5265400045004450
मालेगावपिवळाक्विंटल7341143224139
चिखलीपिवळाक्विंटल1990370047914240
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600415046004350
हिंगोली – खानेगाव नाकापिवळाक्विंटल243385043504100
जिंतूरपिवळाक्विंटल333420045504400
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2312395044804215
किनवटपिवळाक्विंटल36420043504275
मुरुमपिवळाक्विंटल366370143714252
बोरी-अरबपिवळाक्विंटल18431545004400
बाभुळगावपिवळाक्विंटल1100350147504201
सिंदी (सेलू)पिवळाक्विंटल160350044004250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Web Title : विदर्भ-मराठवाड़ा में सोयाबीन के मिले-जुले दाम: विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। कुछ जगहों पर संतोषजनक दरें मिलीं, तो कुछ में कीमतें गिरती-बढ़ती रहीं। औसत दर ₹4,283 प्रति क्विंटल रही, जबकि कोरेगांव में ₹5,328 का उच्च स्तर रहा। विदर्भ-मराठवाड़ा के बाजारों में मिश्रित रुझान देखे गए, कुछ क्षेत्रों में कीमतों में गिरावट आई।

Web Title : Soybean Prices Mixed in Vidarbha-Marathwada Markets: Detailed Report

Web Summary : Soybean prices varied across Maharashtra markets. While some saw satisfactory rates, others experienced fluctuations. The average rate was ₹4,283 per quintal, with Koregaon hitting a high of ₹5,328. Vidarbha-Marathwada markets showed mixed trends, with some areas seeing price declines.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.