Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन विक्रीचा बेस्ट दिवस? कोणत्या बाजारात मिळतोय जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन विक्रीचा बेस्ट दिवस? कोणत्या बाजारात मिळतोय जास्त भाव वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Best day to sell soybeans? Which market is getting the highest price? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन विक्रीचा बेस्ट दिवस? कोणत्या बाजारात मिळतोय जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन विक्रीचा बेस्ट दिवस? कोणत्या बाजारात मिळतोय जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (२३ जानेवारी) रोजी सोयाबीनची एकूण ३७ हजार ४३३ क्विंटल इतकी आवक (Soybean Arrival) नोंदवली गेली.

आजच्या व्यवहारात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली असून काही बाजारांमध्ये दरात तेजी तर काही ठिकाणी आवकेत (Soybean Arrival) घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पिवळ्या सोयाबीनला जोरदार मागणी

आजच्या बाजारात पिवळा सोयाबीन सर्वाधिक मागणीचा ठरला. यवतमाळ, जालना, अकोला, वाशिम, मुर्तीजापूर, अहमदपूर, सिंदी (सेलू) आदी बाजारांमध्ये पिवळ्या जातीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. विशेषतः दर्जेदार, ओलावा कमी असलेल्या मालाला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

कुठे किती आवक?

आजच्या व्यवहारात आवकेचे चित्र संमिश्र राहिले.

कारंजा – ६,५०० क्विंटल

अकोला – ५,६४९ क्विंटल

अमरावती – ५,७८१ क्विंटल

जालना – ४,८३० क्विंटल

वाशिम – ३,३०० क्विंटल

हिंगोली – १,०२० क्विंटल

मुर्तीजापूर – १,१०० क्विंटल

बाभुळगाव – १,१२० क्विंटल

तर जळगाव, राहता, परतूर, नांदगाव, आष्टी (वर्धा) याठिकाणी आवक मर्यादित राहिली.

कुठे आवक वाढली, कुठे घटली?

विदर्भातील बाजारांमध्ये (अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ) आवक तुलनेने वाढलेली दिसली.

मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये (परतूर, देउळगाव राजा, मंठा) आवक घटली.

सर्वाधिक दर कुठे मिळाला?

वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल ६,२५० रुपये असा राज्यातील सर्वाधिक दर मिळाला.

बाभुळगाव – कमाल दर ६,०६५ रु.

जालना – ५,५२५ रु.

अकोला – ५,३६ रु.

यवतमाळ – ५,५०० रु.

सोलापूर (लोकल) – ५,४४५ रु.

सिंदी (सेलू) – ५,४५० रु.

या बाजारांमध्येही उच्च दराची नोंद झाली.

सरासरी दर किती राहिला?

आज सोयाबीनचा सरासरी बाजारभाव सुमारे ५,२०९ रुपये प्रति क्विंटल इतका राहिला.

बहुतांश बाजारांत सरासरी दर ५,००० ते ५,५०० रुपये दरम्यान स्थिर असल्याचे दिसून आले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/01/2026
जळगाव---क्विंटल31520052505250
चंद्रपूर---क्विंटल36420049404700
पुसद---क्विंटल365500054005275
कारंजा---क्विंटल6500475553555150
सेलु---क्विंटल46515552805250
तुळजापूर---क्विंटल165535053505350
राहता---क्विंटल20500052815200
सोलापूरलोकलक्विंटल64533554455350
अमरावतीलोकलक्विंटल5781510053005200
जळगावलोकलक्विंटल9532853285328
नागपूरलोकलक्विंटल629440052515038
हिंगोलीलोकलक्विंटल1020484053405090
मेहकरलोकलक्विंटल1070440054255250
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल265414154035350
जालनापिवळाक्विंटल4830400055255525
अकोलापिवळाक्विंटल5649490053605360
यवतमाळपिवळाक्विंटल1395550055005500
वाशीमपिवळाक्विंटल3300477562505475
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600495053205150
भोकरपिवळाक्विंटल21515153265238
जिंतूरपिवळाक्विंटल246514153535340
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100533054005365
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल18527553005287
परतूरपिवळाक्विंटल33493152645000
देउळगाव राजापिवळाक्विंटल34410051615000
नांदगावपिवळाक्विंटल13525153275251
मंठापिवळाक्विंटल50500051005000
अहमहपूरपिवळाक्विंटल1726532854505389
बुलढाणापिवळाक्विंटल120500053005150
उमरखेडपिवळाक्विंटल160475049004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120475049004800
बाभुळगावपिवळाक्विंटल1120420160655701
काटोलपिवळाक्विंटल485440052584950
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल20400052254800
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल200535054505450
जाफराबादपिवळाक्विंटल192510053005200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आज कुठे मिळतोय जास्त दर? वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Bajar Bhav : Best day to sell soybeans? Which market is getting the highest price? Read in detail