Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : आवक घसरली अन् भाव वाढले; आज सोयाबीनला किती दर मिळतोय?

Soybean Bajar Bhav : आवक घसरली अन् भाव वाढले; आज सोयाबीनला किती दर मिळतोय?

latest news Soybean Bajar Bhav : Arrivals fell and prices increased; What is the price of soybeans today? | Soybean Bajar Bhav : आवक घसरली अन् भाव वाढले; आज सोयाबीनला किती दर मिळतोय?

Soybean Bajar Bhav : आवक घसरली अन् भाव वाढले; आज सोयाबीनला किती दर मिळतोय?

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) मर्यादित राहिल्याने दरात चढ- उतार पाहायला मिळली.

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) मर्यादित राहिल्याने दरात चढ- उतार पाहायला मिळली.

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) घटल्याने दरात चढउतार पाहायला मिळत आहेत.

विशेषतः पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असल्याने काही बाजारांत दराने ५ हजार ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

आज (१८ जानेवारी) रोजी सिल्लोड, बुलढाणा आणि काटोल या प्रमुख बाजार समित्यांमध्ये एकूण सुमारे ५२५ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही आवक काहीशी घसरलेली असल्याचे चित्र आहे.

बाजारनिहाय आवक आणि दर

सिल्लोड बाजार समितीत केवळ १८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे सोयाबीनला किमान ४,६०० रुपये, तर कमाल ४,८०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ४,७०० रुपये राहिला.

बुलढाणा बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली. येथे १९० क्विंटल आवक झाली. किमान ४,६५१ रुपये, तर कमाल ५,२५१ रुपये दर मिळाला. सरासरी दर ४,९०० रुपये राहिला.

काटोल बाजार समितीत सर्वाधिक ३१७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथेही पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी असून कमाल दर ५,३२५ रुपये नोंदविण्यात आला. किमान दर ३,४०० रुपये, तर सरासरी दर ५,२५० रुपये इतका राहिला.

कोणत्या जातीला मागणी?

सध्याच्या बाजारात पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी आहे. दर्जेदार, चकचकीत आणि ओलावा कमी असलेल्या मालाला उच्च दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी साठवलेला चांगल्या प्रतीचा माल टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येते.

आवक का घसरली?

बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीनची विक्री केल्याने तसेच काही शेतकरी आणखी दरवाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरत असल्याने बाजारातील आवक सध्या कमी राहिली आहे. यामुळे काही बाजारांत दराला आधार मिळत आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/01/2026
सिल्लोड---क्विंटल18460048004700
बुलढाणापिवळाक्विंटल190465152514900
काटोलपिवळाक्विंटल317340053255250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज किती भाव; कोणत्या बाजारात आवक घटली? वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की आपूर्ति घटने से कीमतें बढ़ीं: आज के बाजार भाव

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की आपूर्ति कम होने से कीमतों में उतार-चढ़ाव है। पीले सोयाबीन की मांग अधिक है, जो कुछ बाजारों में ₹5,300 तक पहुंच गई। सिल्लोड, बुलढाणा और कटोल में 525 क्विंटल आवक दर्ज की गई। किसान आगे कीमतों में बढ़ोतरी का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Soybean Prices Rise Amidst Falling Supply: Today's Market Rates

Web Summary : Soybean prices fluctuate in Maharashtra due to decreased supply. Yellow soybean demand is high, reaching ₹5,300 in some markets. Sillod, Buldhana and Katol recorded 525 quintals arrival. Farmers await further price increases.