Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (२५ डिसेंबर) रोजी सोयाबीनच्याबाजारभावात मोठे चढ-उतार न होता भाव तुलनेने स्थिर राहिले.
मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत घट झाल्याचे चित्र दिसून आले. आज राज्यभरात एकूण १९ हजार ७९१ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली असून, सरासरी दर ४ हजार ५०३ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला.
आवकेत घट
नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात माल आणण्याऐवजी नोंदणी केंद्रांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे बाजार समित्यांतील आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः लातूर, अकोला, हिंगोली या बाजारांमध्ये आवक असूनही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले.
कोणत्या जातीला जास्त मागणी?
पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले. चांगल्या प्रतीच्या, कमी ओलावा असलेल्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
लातूर (पिवळा) : १३,७३६ क्विंटल आवक; दर ४,११३ ते ४,९५० रुपये
अकोला (पिवळा) : ४,०७४ क्विंटल; दर ४,००० ते ४,८४० रुपये
काटोल (पिवळा) : दर ३,२०० ते ४,५८० रुपये
याउलट, लोकल आणि पांढऱ्या जातीच्या सोयाबीनला तुलनेने मर्यादित मागणी दिसून आली.
कोणत्या बाजारात हमीभाव मिळाला?
शासनाने जाहीर केलेला सोयाबीनचा हमीभाव (MSP) सुमारे ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल आहे. आज काही बाजारांमध्ये या दराच्या जवळपास व्यवहार झाल्याचे दिसून आले.
लातूर : कमाल दर ४,९५० रुपये
सोलापूर : कमाल दर ४,८०० रुपये
लासलगाव-निफाड : कमाल दर ४,७५१ रुपये
तरीही बहुतांश बाजारांमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानेच व्यवहार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजाराऐवजी नाफेडकडे विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 25/12/2025 | ||||||
| तुळजापूर | --- | क्विंटल | 275 | 4650 | 4650 | 4650 |
| सोलापूर | लोकल | क्विंटल | 407 | 4175 | 4800 | 4600 |
| हिंगोली | लोकल | क्विंटल | 600 | 4200 | 4700 | 4450 |
| लासलगाव - निफाड | पांढरा | क्विंटल | 205 | 4017 | 4751 | 4685 |
| लातूर | पिवळा | क्विंटल | 13736 | 4113 | 4950 | 4750 |
| लातूर -मुरुड | पिवळा | क्विंटल | 179 | 3851 | 4700 | 4200 |
| अकोला | पिवळा | क्विंटल | 4074 | 4000 | 4840 | 4545 |
| पैठण | पिवळा | क्विंटल | 5 | 4300 | 4300 | 4300 |
| काटोल | पिवळा | क्विंटल | 310 | 3200 | 4580 | 4350 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
