Soyabean Tur Market Update : राज्यातील कृषी बाजारांमध्ये आज (५ ऑक्टोबर) रोजी सोयाबीन आणि तुरीच्या दरात मिश्र कल पाहायला मिळाला. काही बाजारात आवक (Arrivals) वाढल्याने सोयाबीनचे दर किंचित घसरले, तर तुरीने आपला स्थिर भाव कायम ठेवला. (Soyabean, Tur Market Update)
सोयाबीन बाजारभाव
आज सोयाबीनची एकूण आवक १४९ क्विंटल इतकी झाली. दरात सौम्य चढ-उतार दिसून आले.
जळकोट येथे डॅमेज सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ३५५ रुपये इतका दर मिळाला.
पैठण येथे पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ३ हजार २१ ते ३ हजार ५३६ रुपये, तर सरासरी दर ३ हजार २४१ रुपये नोंदला गेला.
शेवगाव बाजारात पिवळ्या सोयाबीनला ४ हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला.
देवणी येथे दर ३ हजार ७०० ते ४ हजार ३०० रुपये, सरासरी ४ हजार रुपये राहिला.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/10/2025 | ||||||
जळकोट | डॅमेज | क्विंटल | 75 | 4000 | 4355 | 4121 |
पैठण | पिवळा | क्विंटल | 12 | 3021 | 3536 | 3241 |
शेवगाव | पिवळा | क्विंटल | 15 | 3800 | 4000 | 4000 |
देवणी | पिवळा | क्विंटल | 47 | 3700 | 4300 | 4000 |
तूर बाजारभाव
पैठण बाजार समितीत आज तुरीची आवक केवळ १ क्विंटल झाली.
दर स्थिर राहून ६ हजार १५१ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.
तुरीची आवक अत्यल्प असल्याने बाजार भावात स्थिरता कायम आहे.
शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/10/2025 | ||||||
पैठण | --- | क्विंटल | 1 | 6151 | 6151 | 6151 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामडंळ)