Soyabean Market : भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १०० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२३-२४ च्या तुलनेत सन २०२४- २५ मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढ आहे.
सन २०२३-२४ च्या तुलनेत सन २०२४- २५ मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढ आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या, (USDA, नोव्हेंबर २०२५) अहवालानुसार सन २०२५-२६ मध्ये, जगात ४२५८ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ०.३ टक्केनी कमी आहे.
सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती :
- डिसेंबर २०२२ मध्ये ५ हजार ५५६ रुपये प्रति क्विंटल
- डिसेंबर २०२३ मध्ये ४ हजार ८३१ रुपये प्रति क्विंटल
- डिसेंबर २०२४ मध्ये ४ हजार १४३ रुपये प्रति क्विंटल
लातूर बाजारातील सोयाबीनच्या संभाव्य किंमती - डिसेंबर २०२५ : ४ हजार ५१५ ते ४ हजार ८९५ रुपये प्रति क्विंटल सदर संभाव्य किंमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे.
सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १८.० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी सोयाबीन पिकांचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
