Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार? 

Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार? 

latest News Soyabean Market what is Soybean market price in 2025 new year | Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार? 

Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार? 

Soyabean Market : चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. येणाऱ्या नवीन तरी भाव मिळणार का?

Soyabean Market : चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. येणाऱ्या नवीन तरी भाव मिळणार का?

Soyabean Market :  भारतात सन २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे उत्पादन (Soyabean Production) १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ७.७९ टक्क्यांनी अधिक आहे. तर बाजारभावाचा विचार केला तर  यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये सोयाबीनच्या किंमती सरासरी ४ हजार ४०० रुपये ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असण्याची शक्यता आहे. 

सन २०२२-२२ च्या तुलनेत सन २०२३-२४ मध्ये सोयाबीन तेलाची (Soyabean Oil) आयात अधिक झाली आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात ४२१९ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी (३९४७ लाख टन, २०२३-२४) अधिक आहे. भारतात सन २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ७.७९ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोयाबीनची (Soyabean Market) मासिक बाजारात आवकमध्ये कमी आहे. 

चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर २०२४ मध्ये ९.०८ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे (५.८६ लाख टन, एप्रिल ते सप्टेंबर २०२३) अशी आहे. 

अशा राहतील किंमती  

सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४८९२ प्रती क़्विटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीतील महिन्यातील सरासरी किंमती या पुढीलप्रमाणे होत्या. जानेवारी ते मार्च २०२२ मध्ये ६ हजार ६८४ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये ५ हजार २८४ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये ४ हजार ५९२ रुपये प्रति क्विंटल अशा होत्या. तर यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये सोयाबीनच्या किंमती सरासरी ४ हजार ४०० रुपये ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असण्याची शक्यता आहे. 

- बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष 

Web Title: latest News Soyabean Market what is Soybean market price in 2025 new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.