Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : MSP जाहीर केल्यांनतर साेयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Soyabean Market : MSP जाहीर केल्यांनतर साेयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

latest News Soyabean Market How will soybean prices remain after MSP is announced Read in detail | Soyabean Market : MSP जाहीर केल्यांनतर साेयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Soyabean Market : MSP जाहीर केल्यांनतर साेयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Soyabean Market : सरकारच्या या निर्णयाचा देशातील साेयाबीन उत्पादकांना (Soyabean farmers) जबर फटका बसणार आहे.

Soyabean Market : सरकारच्या या निर्णयाचा देशातील साेयाबीन उत्पादकांना (Soyabean farmers) जबर फटका बसणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे
नागपूर :
केंद्र सरकारने कच्च्या साेयाबीन, सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क  (Import Duty) २० टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून, ऑक्टाेबरपासून पुढे साेयाबीनचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा कमी राहणार आहे. परिणामी, सरकारच्या या निर्णयाचा देशातील साेयाबीन उत्पादकांना (Soyabean farmers) जबर फटका बसणार आहे.

सरकारने २०२४ मध्ये कच्च्या खाद्यतेलावर २० टक्के, तर रिफाइंड खाद्यतेलावर २९.७५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला हाेता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीसाठी २७.५० टक्के, तर रिफाइंड तेलासाठी (Refind Oil) ३५.७५ टक्के शुल्क द्यावा लागायचा. देशात साेयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० मे राेजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये ५० टक्क्यांनी कपात केली आहे. 

रिफाइंड साेयाबीन, सूर्यफूल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीला उपकरांसह १६.५० टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील खाद्यतेल उत्पादक कंपन्यांच्या फायद्याचा ठरणार असून, शेतकऱ्यांना मात्र ‘एमएसपी’पेक्षा कमी दरात साेयाबीन विकावे लागणार आहे.

ऑगस्टपासून डिलेव्हर सुरू
यात सर्वाधिक कच्च्या साेयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी साैदे सुरू केले असून, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ते तेल देशात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे साेयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर ४,००० ते ४,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार शेतकऱ्यांकडील संपूर्ण साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची सुतराम शक्यता नाही. 

ब्राझिलचे साैदे ११ डाॅलर प्रतिबुशेल
ब्राझिलमध्ये साेयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन २०२६ साठी त्यांच्या साेयाबीनचे ११ डाॅलर प्रतिबुशेल (एक बुशेल-२७.२२ किलाे) दराने आताच साैदे केले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात साेयाबीनचे दर ३,४५८ ते ३,५५० रुपये प्रतिक्विंटल असेल. या हंगामासाठी केंद्र सरकारने साेयाबीनची एमएसपी ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.
 

Web Title: latest News Soyabean Market How will soybean prices remain after MSP is announced Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.