Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत ४१०० प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत १.५ टक्के घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती (Soyabean Bajarbhav) या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या सोयाबीनची आवकमध्ये (Soyabean Aavak) तुलनेत राष्ट्रीय पातळीवर २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी सोयाबीनच्या इंदोर बाजारात सरासरी किंमती सर्वाधिक ४१७७ रुपये प्रति क्विंटल होत्या. तर अमरावती बाजारात सरासरी किंमती ३९२८ रुपये प्रति क्विंटल होत्या.
लातूर बाजारातील सोयाबीनच्या साप्ताहिक सरासरी किमती पाहिल्या असता नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरासरी ०४ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा दर ०४ हजार १०० रुपयांपर्यंत येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे. तर राज्यातील सोयाबीनची मागील आठवड्यातील आवक पाहिले असता आवकेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ४० ते ४५ हजार टन इतकी होती. ती आता ५० हजार टनांपर्यंत पोहोचल्याच दिसून येत आहे. मागील सप्ताहातील सोयाबीनच्या निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिल्या असता अकोला बाजारात ०४ हजार ४८ रुपये, वाशिम बाजारात ४ हजार १२९ रुपये, तर लातूर बाजार ०४ हजार ९२ रुपये दर मिळाला. म्हणजेच किमान आधारभूत किमतीपेक्षा या किमती खूपच कमी असल्याचं चित्र आहे.