Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला कांदा व्यवहार बंद असल्याने लाखोंची उलाढाल ठप्प, आज मार्केटमध्ये काय परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:45 IST

Sinnar Kanda Market : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारभावात घसरण झाली होती.

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारभावात घसरण झाली होती. व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर कांदा साठवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मंगळवारी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला होता. 

मंगळवारी कांदा लिलाव बंद असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र होते. मंगळवारी कांदा लिलाव बंद करण्याबाबत व्यापारी संघटनेने बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे यांना निवेदन दिले होते.

सोमवारी बाजार समितीत ४१ पिकअप, १५२ ट्रॅक्टर अशा एकूण १९३ वाहनांतून सुमारे ४,२१० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त १,१७५ रुपये, किमान ४०० रुपये, सरासरी ९७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

शेतकरीवर्गात नाराजी; अपेक्षेपेक्षा कमी दरकांद्यालाही अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी होती. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी बाजार समितीच्या आवारात न आणल्याने शुकशुकाट दिसून आला.

 

सकाळ सत्रातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/02/2026
अकलुज---क्विंटल37720018001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5202100019001450
खेड-चाकण---क्विंटल7500100016001200
नागपूरलालक्विंटल1380150018001725
मनमाडलालक्विंटल800030011701000
भुसावळलालक्विंटल29100015001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140016001500
वडूजलोकलक्विंटल2550015001000
कामठीलोकलक्विंटल6208025802330
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2530040014701025
English
हिंदी सारांश
Web Title : Sinnar Onion Trade Halt: Lakhs in Turnover Frozen, Market Update

Web Summary : Onion auctions in Sinnar stopped due to increased supply and falling prices. Traders lacked storage, causing a halt and financial losses. Farmers are unhappy with low rates that don't cover costs. Other market rates are also shown.
टॅग्स :कांदासिन्नरनाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र