Join us

Shravan Mahina Peanut Price : श्रावण महिन्याला सुरवात, शेंगदाणा, साबुदाण्याला काय भाव? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:47 IST

Shravan Mahina Peanut Price : उपवासाच्या जवळपास सर्वच पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो.

नाशिक : हिंदू धर्मात व्रत, वैकल्याचा महिना अशी श्रावण (Shravan Mahina) महिन्याची ओळख आहे. कोणी महिनाभराचे उपवास करतात, कोणी प्रत्येक श्रावण सोमवार करतो तर कोणी श्रावण शनिवारचा उपवास करतात. मात्र, श्रावण महिना सुरू होण्याच्या पंधरा दिवस अगोदरच उपवासाचे पदार्थ महागले आहेत. शेंगदाणे तब्बल १४० रुपये, तर साबुदाणा ८० रुपये किलो झाला आहे. 

श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात आहारात शेंगदाण्याचा (Peanuts Price) वापर होत असतो. उपवासाच्या जवळपास सर्वच पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो. शिवाय भगर, राजगीरा, साबुदाणा, शेंगदाणा, शिंगाळे, केळी असे पदार्थ उपवास करणाऱ्या व्यक्तीला खाता येतात. भगर, राजगिरा हे पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामुळे जे पदार्थ खाल्ले जातात, त्यांना या महिन्यात मागणी जास्त असते. परिणाम भावात थोडाफार फरक पडतो,

यामुळे वाढले दरउपवास आले तर विविध प्रदार्थाचे दर मागणी वाढली म्हणजे वाढतच असतात. त्यातच मागणीच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. नाशिकमध्ये कर्नाटक, गुजरात येथून शेंगदाणे येतात. दरम्यानन श्रावण महिना अन् नवरात्रात उपवासाच्या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते. मात्र, आता चार-पाच दिवसांपासून शेंगदाणे २० रुपयांनी महागले आहेत. इतर वस्तूंचे दर पंधरा दिवसांपासून पाच ते दहा रुपयांनी किलोमागे वाढले. शेंगदाणा, साबुदाण्याची सर्वाधिक आवक व मागणी आहे; पण भावात काहीशी वाढ झाली असली तरी उपवासाच्या पदार्थांना मागणी कमी झालेली नाही.- शेखर दशपुते, माजी अध्यक्ष धान्य किराणा संघटना

कसे बाजारभाव आहेत? 

पुणे बाजारात शेंगदाण्याला क्विंटलमागे सरासरी दहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळतो आहे. तर मुंबई बाजारात 11 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. किरकोळ बाजारातील भाव पाहिले असता शेंगदाणे जवळपास 130 रुपये ते 145 रुपये किलो, राजगिरा 105 रुपये ते 110 रुपये किलो, खजूर 120 रुपये ते 200 रुपये किलो, भगर 105 रुपये ते 110 रुपये किलो, तर शेंगदाणा तेल 175 रुपये ते दोनशे रुपये किलो असे बाजारभाव आहेत.

टॅग्स :श्रावण स्पेशलमार्केट यार्डनाशिकनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३शेती