Lokmat Agro >बाजारहाट > Shetmal Bajar Samiti : सोयाबीन, हळद माल शिल्लकच; भाववाढीची शाश्वती मिळेना करायचे तरी काय?

Shetmal Bajar Samiti : सोयाबीन, हळद माल शिल्लकच; भाववाढीची शाश्वती मिळेना करायचे तरी काय?

latest news Shetmal Bazaar Samiti: Soybean, turmeric stocks are still available; What if there is no guarantee of price hike? | Shetmal Bajar Samiti : सोयाबीन, हळद माल शिल्लकच; भाववाढीची शाश्वती मिळेना करायचे तरी काय?

Shetmal Bajar Samiti : सोयाबीन, हळद माल शिल्लकच; भाववाढीची शाश्वती मिळेना करायचे तरी काय?

Shetmal Bajar Samiti : हळद व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने माल बाजारात विक्रीस न आणता साठवत बसले. मात्र, सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही दर स्थिरच राहिल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेरणीचा खर्च, साठवण भाडं, आणि नव्या हंगामासाठी रोख गरज. या सगळ्यातून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (Shetmal Bajar Samiti)

Shetmal Bajar Samiti : हळद व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने माल बाजारात विक्रीस न आणता साठवत बसले. मात्र, सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही दर स्थिरच राहिल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेरणीचा खर्च, साठवण भाडं, आणि नव्या हंगामासाठी रोख गरज. या सगळ्यातून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. (Shetmal Bajar Samiti)

शेअर :

Join us
Join usNext

Shetmal Bajar Samiti : सोयाबीन आणि हळद या पिकांच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आहे. बाजारात मागणी आणि पुरवठा यांच्या असंतुलनामुळे भावात स्थिरता पाहायला मिळत आहे, ज्यामुळे उत्पादकांची भाववाढीची आशा धूसर झाली आहे.(Shetmal Bajar Samiti)

हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन व हळद बाजारात विक्रीस न आणता भाववाढीची वाट पाहत साठवून ठेवले. मात्र, सोयाबीन जवळपास सात महिने तर हळद तीन महिने विक्रीविना ठेवूनही बाजारात अपेक्षित भाववाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (Shetmal Bajar Samiti)

गेल्या काही आठवड्यांपासून सोयाबीनला केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. तर हळददेखील सरासरी १२ हजारांच्या आतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीविना ठेवून उपयोग झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Shetmal Bajar Samiti)

शेतमाल साठवून ठेवण्याचा खर्च, गोदामभाडे आणि दररोजचा आर्थिक ताण सहन होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता मिळेल त्या भावात शेतमाल विक्रीचा विचार सुरू केला आहे.(Shetmal Bajar Samiti)

लागवड खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव द्या

* अलीकडच्या काळात लागवड खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मात्र शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाही. सरकारने दर निश्चित करावा किंवा किमान हमीभावात माल खरेदीची हमी द्यावी. सध्या बाजारात व्यापाऱ्यांचीच मक्तेदारी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.

* मागणी असूनही दर न वाढण्यामागचे कारण शोधावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हळद आणि सोयाबीन ही दोन्ही नगदी पिके असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहेत. मात्र, दरवर्षी भावाचे चढ-उतार पाहता शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगच अधिक होत आहे.

भावात स्थिरता; शेतकऱ्यांत बेचैनी

सध्या मोंढ्यात सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांवर भाव मिळत नाही. तर गतवर्षीच्या तुलनेत हळदही पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. 

शेतमालाच्या भावात स्थिरता राहत असल्यामुळे शेतकऱ्यांत बेचैनी वाढल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च लक्षात घेतला तर सद्यः स्थितीत शेतमालाचे दर पाहता शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे.

बियाणांच्या किमतीत वाढ; शेतमाल पडत्या भावात

बी-बियाणांच्या किमतीत दरवर्षी भरमसाठ वाढ होते. या भाववाढीचा मारा सहन करीत शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावी लागतात.

तर दुसरीकडे मात्र शेतमालाच्या भावात वाढ होत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

सध्या खरीपाची पेरणी सुरू असल्यामुळे पैशाचीही निकड भासत असल्याने शेतमालाची आवक वाढली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

Web Title: latest news Shetmal Bazaar Samiti: Soybean, turmeric stocks are still available; What if there is no guarantee of price hike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.