Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर

Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर

latest news Shetmal BajarBhav: Slowdown in tur-harbha; New twist in sugar market Read in detail | Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर

Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर

Shetmal BajarBhav : केंद्राच्या शुल्कमुक्त आयात धोरणामुळे तूर आणि हरभऱ्याच्या दरावर दबाव आला असून तुरीत तब्बल ६०० रुपयांची घसरण झाली आहे. आयात-निर्यात धोरण, देशांतर्गत आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत. (Shetmal BajarBhav)

Shetmal BajarBhav : केंद्राच्या शुल्कमुक्त आयात धोरणामुळे तूर आणि हरभऱ्याच्या दरावर दबाव आला असून तुरीत तब्बल ६०० रुपयांची घसरण झाली आहे. आयात-निर्यात धोरण, देशांतर्गत आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत. (Shetmal BajarBhav)

संजय लव्हाडे 

जालना : जालना येथे कृषी व सराफा बाजारात एकाच वेळी वेगवेगळी चित्रे दिसत आहेत. केंद्र सरकारच्या डाळवर्गीय पिकांवरील शुल्कमुक्त आयात धोरणामुळे तूरहरभराबाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Shetmal BajarBhav)

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत असून आगामी काळात साखरेच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, सोने-चांदीच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे.(Shetmal BajarBhav)

तुरीचे दर ६०० रुपयांनी घसरले

म्यानमारमधील 'लेमन' तुरीचा हंगाम सुरू होताच त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटले. आयात सुलभ झाल्याने तुरीच्या दरात सलग ६०० रुपयांची घसरण झाली आहे. 

व्यापारी सावध भूमिका घेत असून पुढील दोन महिन्यांत मोठी तेजी येण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हरभरा बाजारावर आयातीचा दबाव

ऑस्ट्रेलिया, तंझानिया आदी देशांतून हरभऱ्याची आयात सुरूच आहे. सध्या भारतीय बंदरांवर सुमारे ३.५० लाख टन आयातीत चणा साठा उपलब्ध आहे. 

आणखी ३ ते ४ जहाजे लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत नव्या उत्पादनाची आवक वाढल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये दरांवर दबाव कायम आहे.

साखरेला मिळणार आधार?

अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान होऊन साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. केंद्राने २०२५-२६ हंगामासाठी २० लाख टन साखर निर्यात कोटा दिला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील चांगले दर आणि वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

चालू हंगामातील निर्यात सुमारे सात लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सोने-चांदीत पुन्हा तेजी

तीन दिवस घसरणीनंतर सराफा बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. सध्या सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर २ लाख ६० हजार रुपये प्रति किलो इतका नोंदवला जात आहे. 

आंतरराष्ट्रीय घडामोडी व गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दरांना आधार मिळत असल्याचे व्यापारी सांगतात.

बाजारभाव (प्रतिक्विंटल)

गहू : २,२०० ते ५,००० रु.

ज्वारी : २,०५० ते ४,६०० रु.

बाजरी : २,४५० ते ३,२०० रु.

मका : १,३०० ते १,६७५ रु.

तूर (काळी) : ७,९०० ते ८,१०० रु.

हरभरा : ४,८५० ते ५,३०० रु.

सोयाबीन : ४,५०० ते ५,४०० रु.

गूळ : ३,९५१ ते ४,१६५ रु.

डाळवर्गीय पिकांवरील आयात सवलतीमुळे तूर-हरभरा उत्पादकांना फटका बसत आहे, तर अतिवृष्टीचा परिणाम साखर उद्योगावर दिसू लागला आहे.

दुसरीकडे, सराफा बाजारातील तेजीने ग्राहकांचे बजेट पुन्हा ताणले आहे. पुढील काही आठवड्यांत आयात, निर्यात व उत्पादनाच्या आकडेवारीवर बाजाराचे गणित अवलंबून राहणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : हरभरा विकला तर तोटा, थांबलो तर संकट; शेतकरी द्विधा मनःस्थितीत वाचा सविस्तर

अधिक वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेतीचा फॉर्म्युला हिट; जालन्यातील शेतकऱ्याने मोडला उत्पादनाचा विक्रम

Web Title : तुअर और चना की कीमतों में गिरावट; चीनी बाजार में नया मोड़।

Web Summary : आयात नीतियों से तुअर और चना की कीमतों में गिरावट। उत्पादन में कमी के कारण चीनी की कीमतें बढ़ सकती हैं। सोना और चांदी की कीमतों में उछाल। अनाज और दालों के बाजार भाव दिए गए हैं। कुल मिलाकर, आयात नीतियों का दालों पर असर, जबकि मौसम का चीनी पर; कीमती धातुओं में लाभ।

Web Title : Tur and Gram Prices Fall; Sugar Market Sees a Twist.

Web Summary : Import policies depress tur and gram prices. Sugar prices may rise due to reduced production. Gold and silver prices surge. Market rates for grains and pulses are provided. Overall, import policies affect pulses, while weather impacts sugar; precious metals gain.