Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shetmal Bajar Samiti : बाजारात ‘ओव्हरलोड’; शेतमाल वाढताच दरांवर दबाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:55 IST

Shetmal Bajar Samiti : शासकीय सुट्ट्यांमुळे मागील १५ दिवसांत केवळ ५ दिवसच लिलाव झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये शेतमालाची प्रचंड गर्दी झाली आहे. अचानक वाढलेल्या आवकेमुळे तूर, सोयाबीनसह विविध पिकांच्या दरांवर दबाव आला आहे.(Shetmal Bajar Samiti)

यवतमाळ : शासकीय सुट्ट्या आणि मार्च अखेरमुळे मागील १५ दिवसांत केवळ पाचच दिवस बाजार समित्यांमध्ये शेतमालाचा लिलाव झाल्याने जिल्ह्यातील बाजार व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.(Shetmal Bajar Samiti)

विक्रीला विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात आणला आणि परिणामी आवक वाढताच दरांवर दबाव आला. तूर, सोयाबीन आणि हरभरा या प्रमुख पिकांच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे.(Shetmal Bajar Samiti)

बाजारात 'हाऊसफुल' परिस्थिती

सोमवारी लिलाव होणार असल्याने शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळपासूनच शेतमाल बाजारात आणण्यास सुरुवात केली. यामुळे बाजार समित्या अक्षरशः हाऊसफुल झाल्या.

यवतमाळातील चिंतामणी खासगी बाजार समितीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल आल्याने काही काळ वाहनांना प्रवेश थांबवावा लागला. त्यामुळे बाजार समितीबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले.

दरांवर दबाव

अचानक वाढलेल्या आवकेमुळे शेतमालाचे दर घसरले असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सोयाबीन

शुक्रवारी : ५,१०० ते ५,७६०रु.

सोमवारी : ५,१०० ते ५,७०७रु.

क्विंटलमागे सुमारे ५०– ६० रु. घसरण

तूर 

शुक्रवारी : ७,९०० रु. पर्यंत

सोमवारी : ६,८०० रु. ते ७,५०० रु.

क्विंटलमागे ३०० ते ४०० रु. घसरण

हरभरा

शुक्रवारी : ५,३२५ रु. पर्यंत

सोमवारी : ४,८०० ते ५,२७५

दरात घसरण

बीजवाई दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाले, तर इतर सोयाबीनचे दर ५,१०० ते ५,५०० दरम्यान राहिले.

गव्हाच्या आवकेने वाढली गर्दी

जिल्ह्यात यंदा गव्हाचे उत्पादन विक्रमी झाल्याने बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गहू विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या गर्दीत आणखी भर पडली आहे.

शेतकऱ्यांची कोंडी

लिलावाचे दिवस कमी आणि एकाच वेळी वाढलेली आवक यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

वाहनांसह प्रतीक्षा

कमी दरात विक्रीची वेळ

बाजार व्यवस्थेवरील ताण

या सर्व कारणांमुळे शेतकरी नाराज झाले आहेत.

लिलावाचे दिवस कमी झाल्याने निर्माण झालेल्या गर्दीचा थेट परिणाम शेतमालाच्या दरांवर झाला आहे. बाजार समित्यांमध्ये नियोजनाचा अभाव आणि अचानक वाढलेली आवक यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, पुढील काळात लिलावाचे दिवस वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन बाजारात मोठा ट्विस्ट; दर वाढले, पण फायदा कुणाला?

अधिक वाचा : Harbhara Kharedi : सरकार, अजून किती थांबायचं? 'या' कारणामुळे शेतकरी संतप्त

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal Market Overloaded; Crop Prices Fall Amidst High Supply

Web Summary : Yavatmal market faces strain due to accumulated supply after holidays. Increased arrivals of soybean, tur, and gram caused price drops, impacting farmers. Wheat arrivals worsen congestion, prompting calls for increased auction days to ease pressure.
टॅग्स :शेती क्षेत्रतूरसोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती