Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियाने भारतीय शेंगदाण्यांच्या आयातीवरील बंदी उठवली, मात्र एक अडचण उभी राहिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:35 IST

Shengdana Export : बंदी उठवल्यापासून केवळ ८०० टन शेंगदाणा आयात झाल्याची माहिती आहे. 

Indian Penuts Export : इंडोनेशियाने भारतीय शेंगदाण्यांवरील बंदी उठवली आहे. मात्र, भारतीय निर्यातदार शेंगदाणा निर्यातीसाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. बंदी उठवली असली तरीही धोका टळला नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. बंदी उठवल्यापासून केवळ ८०० टन शेंगदाणा आयात झाल्याची माहिती आहे. 

इंडोनेशियाने सप्टेंबर २०२५ मध्ये भारतातून शेंगदाण्यांच्या आयातीवर बंदी घातली होती. शेंगदाण्यांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात अफलाटॉक्सिनची उपस्थिती होती, ज्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात, असे कारण त्यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर आता इंडोनेशियाने भारतीय शेंगदाण्यांच्या आयातीवरील बंदी उठवली. 

निर्यातदारांनी काय म्हटलेदरम्यान बंदी उठवताना इंडोनेशियाने अतिशय कठीण आणि जाचक अटी निर्यातदारांसमोर ठेवल्या आहेत. यानुसार केवळ ७५ निर्यातदारांची यादी जाहीर केली आहे. गुणवत्ता मानकांचे पालन न केल्यामुळे, विशेषतः उच्च अफलाटॉक्सिन पातळीमुळे, इंडोनेशियाने २ सप्टेंबर २०२५ पासून शेंगदाण्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातदारांचे म्हणणे आहे की इंडोनेशियाकडून भारतातून शेंगदाण्याच्या आयातीच्या हाताळणीत काही समस्या आहेत.

इंडोनेशिया प्रमुख खरेदीदार इंडोनेशिया हा एक प्रमुख खरेदीदार आहे आणि भारताच्या शेंगदाण्याच्या निर्यातीपैकी सुमारे एक तृतीयांश शेंगदाणे खरेदी करतो. २०२४ मध्ये, देशाने भारताच्या एकूण शेंगदाण्या उत्पादनापैकी २७.७ दशलक्ष टन खरेदी केले, ज्याचे मूल्य २८० दशलक्ष डॉलर आहे.

भारतात शेंगदाण्याचे दर आधीच कमी आहेत, दुसरीकडे अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. २०२५ मध्ये एकट्या गुजरातने विक्रमी ६ लाख ७० हजार टन शेंगदाणे उत्पादन केले. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती असण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजनाशेतकरी