Join us

Seetapal Market : बारुळची सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबादसह बाहेरच्या बाजारात विक्रीसाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:43 IST

Seetapal Market : बारुळच्या फळबागांमधून यंदा दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर राज्यांत पाठवल्या जात आहेत. एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान आहे.(Seetapal Market)

गोविंद शिंदे

बारुळच्या फळबागांमधून यंदा दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर राज्यांत पाठवल्या जात आहेत. एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान आहे. (Seetapal Market)

कंधार तालुक्याच्या डोंगराळ भाग बारूळ, पेठवडज आदी ठिकाणांसह राज्यभर प्रसिद्ध असून, येथील शेतकऱ्यांचे दिवाळीचे चेहरे यंदा गोड झाले आहेत. बारुळच्या फळबागांमधून दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद, नागपूर, तेलंगणा आणि कर्नाटकसह विविध शहरांत पाठवली जात आहेत. (Seetapal Market)

सध्या एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. (Seetapal Market)

शेतकऱ्यांसाठी रोजगाराचे नवे मार्ग

डोंगराळ भागातील बागेत दररोज पाच ते सहा डाल कच्च्या सीताफळ्यांची नांदेड, कंधार, नायगाव, मुखेड बाजारपेठेत विक्री केली जाते. यामुळे मजुरांना दररोज १ हजार ५०० रुपयांपर्यंत रोजगार मिळतो. रोजगार आणि फळबागायती व्यवसायामुळे शेतकरी समुदाय दिवाळी आनंदात साजरी करत आहे.

कंधार तालुक्याचे फळबाग शेतकरी विशेषतः सीताफळ आणि आंबा लागवड करतात. यंदा शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून झाडे टिकवली आहेत आणि फळधारणा उत्कृष्ट झाली आहे.

भाव आणि बाहेरच्या बाजारात मागणी

बारुळ व पेठवडज मधील सीताफळांची विक्री राज्यात १०० ते १२० रुपये किलो दराने केली जात आहे.

विशेषतः आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह इतर राज्यांत विकल्यास उत्पादकांना अधिक फायदा होतो.

एका एकरात ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना होतो फायदा 

सीताफळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे.

मजुरांना रोजगार मिळाला असून स्थानिक अर्थव्यवस्था सुदृढ झाली आहे.

बाहेरच्या राज्यांत विक्रीमुळे उत्पादकांना चांगला दर मिळतो आणि बाजारपेठेची मागणी टिकते.

आम्ही खासगी वाहने वापरून सीताफळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी ठिकाणी विक्रीस पाठवत आहोत. तिथे सीताफळाला १०० ते १२० रुपये किलोचा भाव मिळत आहे. - निसार पाशा, व्यापारी

बाजारात आवक कमी झाल्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा चांगली फळधारणा झाल्यामुळे आर्थिक फायदाही मोठा होईल.- अशोक भोसकर, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर: Bijwai Soybean Market Update : बिजवाई सोयाबीनचे दर वाढले, पण उत्पादन कमी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Custard Apples from Barul Reach Capital, Farmers Rejoice!

Web Summary : Barul's custard apples reach Mumbai, Hyderabad, earning farmers good profits. High demand fetches ₹200-300 per 'dali'. Exports to other states yield ₹100-120/kg. Limited supply boosts rates, offering ₹5-6 lakh/acre income. Farmers are happy due to good yield.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीफळेबाजारमार्केट यार्ड