यवतमाळ : अमेरिकेतील आयात होणाऱ्या वस्तूंवर शून्य टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. हा टैरिफ काही मोजक्याच वस्तूंवर लावण्यात आला आहे. यानंतरही सोयाबीन प्लान्ट मालकांनी कमी दरातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी बाजारात अफवा पसरविली आहे. यातून दोन दिवसांत प्लान्टचे दरही पडले आहे. यामुळे सोयाबीनचे दर क्विंटलमागे ५५०० ते ५३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असताना जागतिक बाजारातील घडामोडीचा परिणाम थेट कृषी मालाच्या विक्रीवर झाला आहे. यात अमेरिकेतील वस्तू शून्य टक्के टॅरिफवर येणार आहेत. यात फळ, भाज्या, जेम्स, ज्वेलरी, जेनेरिक औषधीचा समावेश आहे. मका, सोयाबीन, गहू, तांदूळ याच्या आयातीवर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.
यानंतरही प्लान्ट मालकांनी शून्य टक्के आयकरावर सोयाबीन देशात येणार असल्याची अफवा सुरू केली आहे. यातून प्लान्टमधील सोयाबीन खरेदी दरात कपात केली. आठ दिवसांपूर्वी प्लान्ट खरेदीचे सोयाबीनचे दर ६१०० रुपये होते. ते आता ५७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यात क्विंटलमागे ४०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन खरेदीचे दर क्विंटल मागे ५३०० ते ५४०० पर्यंत खाली आले आहेत.
अचानक दर घसरल्याने गर्दी वाढण्याचा धोका
सोयाबीनवरील कुठलेही आयात शुल्क कमी केलेले नाही. यानंतरही सोयाबीनवरील आयात शुल्क निरंक झाल्याची अफवा बाजारात आहे. यातून पुढील काळात सोयाबीनचे दर कमी होतील म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. बाजारात एकाचवेळी सोयाबीनची आवक झाल्याने बाजारातील सोयाबीनचे खरेदीचे दर दबावात आले आहेत.
अभ्यासक म्हणतात, शेतकऱ्यांनो धीर धरा
बाजारात एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी काढू नका, यामुळे बाजारात सोयाबीनचे दर पडण्याचा धोका आहे. आवश्यकता असेल तितकेच सोयाबीन विकले तर दर नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध होवून शेतमाल विक्रीसाठी संथगतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. तरच शेतमालाचे दर योग्य मिळण्यास मदत होईल.
Harbhara Market : नवीन हरभऱ्याची आवक, तूर, सोयाबीनपेक्षा 'या' हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय!
