Roses in Demand : जागतिक 'व्हॅलेंटाइन डे' (Valentine's Day) निमित्त गुलाबांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा थेट फायदा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. (Roses in Demand)
यंदा वाढत्या मागणीमुळे गुलाबांचे दर १००-१२५ रुपयांवरून थेट ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. (Roses in Demand)
मागणी वाढली; दरात उसळी
'व्हॅलेंटाइन वीक'पासूनच बाजारात फुलांची मागणी वाढू लागली होती. लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम आणि समारंभ यामुळेही फुलांची मागणी वाढली आहे. मात्र, तुलनेत आवक कमी असल्याने दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली.
नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील फूल बाजारात गुलाबांची विक्री तेजीत होती. डच जातीच्या पिंक आणि येलो शेडिंग गुलाबांना विशेष मागणी मिळाली.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती
फुलशेती हा खर्चिक व्यवसाय मानला जातो. खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढत असताना योग्य दर मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते.
सध्याच्या दरवाढीमुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून नफा मिळण्याची संधी मिळाली आहे.
विशेषतः नियंत्रित शेती (शेडनेट/पॉलीहाऊस) करणाऱ्या शेतकऱ्यांना डच जातीच्या गुलाबांमुळे अधिक फायदा होत आहे. या जाती टिकाऊ असल्याने आणि आकर्षक रंगांमुळे बाजारात त्यांना जास्त मागणी असते.
दरातील चढ-उताराची चिंता
तज्ज्ञांच्या मते, व्हॅलेंटाइन डे संपल्यानंतर मागणी कमी होण्याची शक्यता असल्याने दर पुन्हा स्थिरावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील स्थिती लक्षात घेऊन नियोजनबद्ध विक्री करणे गरजेचे आहे.
शनिवारचे गुलाब दर (प्रति नग/बुके)
डच गुलाब: ५० रु. (सिंगल)
दंडी गुलाब: १५० रु.
डेकोरेटेड गुलाब: १५० रु.
शिर्डी गुलाब: १८० रु.
गावरान गुलाब: १६० रु.
गुलाब बुके: २०० रु.
हार्ट डेकोरेटेड गुलाब: ३५० रु.
पिंक/येलो शेडिंग डच गुलाब: ४०० रु.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीचे दर कोसळले; आठवड्यातच 'इतक्या' रुपयांची घसरण वाचा सविस्तर
