Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : पारनेरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:41 IST

Kanda Bajarbhav : आज १८ जानेवारी रोजी राज्यातील मार्केटमध्ये ६४ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज १८ जानेवारी रोजी राज्यातील मार्केटमध्ये ६४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. येथील पारनेर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी २०० रुपये, सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे- खडकी मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ९५० रुपये, पुणे -पिंपरी मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, पुणे-मोशी मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

जुन्नर -आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १२०० रुपये तसेच शिरुर-कांदा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Parner Sees Highest Red Onion Arrival; Today's Rates

Web Summary : Maharashtra's markets saw 64,000 quintals of onion arrivals on January 18. Parner market in Ahmednagar district had the highest red onion arrival, fetching an average rate of ₹1400. Pune and Chhatrapati Sambhajinagar markets also saw varying rates.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक