Lokmat Agro >बाजारहाट > Nashik Cargo service : नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर 

Nashik Cargo service : नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर 

Latest News Record 1146 million tonnes of agricultural produce exported from Nashik in single month, read in detail | Nashik Cargo service : नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर 

Nashik Cargo service : नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर 

Nashik Cargo service : विशेष करुन नाशवंत माल व फळे, भाजीपाला यासाठी उपयोग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सेवा लाभदायी ठरली आहे.

Nashik Cargo service : विशेष करुन नाशवंत माल व फळे, भाजीपाला यासाठी उपयोग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सेवा लाभदायी ठरली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक (ओझर) विमानतळाने आंतरराष्ट्रीय कार्गो निर्यातीत (Cargo Export) प्रगतीचा आलेख उंचावला आहे. विमानतळाने देशात अकराव्या तर राज्यात दुसऱ्यास्थानी झेप घेतली. मे २०२५ या एकाच महिन्यात तब्बल ११४६ मॅट्रिक टन एवढे कार्गो विविध देशांमध्ये पोहोचविले गेले आहे. कार्गो वाहतुकीचा हा नाशिक विमानतळाचा उच्चांक आहे.

सन २०२३- २४ या आर्थिक वर्षात या विमानतळावरून ४०० टन इतकी कार्गो निर्यात झाली होती. गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) त्यामध्ये अकरापट वाढ होऊन हा आकडा तब्बल ४४०० मॅट्रिक टनापर्यंत पोहोचला होता. यंदा तर केवळ मे महिन्यात तब्बल ११०० मेट्रिक टन एवढी विक्रमी निर्यात येथून झाली. 

यामध्ये प्रामुख्याने मेंढ्या तसेच फळे, भाजीपाला आणि फुले यांचा समावेश आहे. नाशिकहून मुख्यतः मध्य पूर्व आशियायी देश आणि काही प्रमाणात युरोपमध्ये हा माल निर्यात होतो. एचएएल आणि हेलकोनच्या माध्यमातून नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा पुरवली जाते.

दिल्ली प्रथम, तर मुंबई द्वितीय स्थानावर
आंतरराष्ट्रीय कार्गो निर्यातीत नाशिकचा देशात अकरावा क्रमांक आहे. देशाची राजधानी दिल्ली पहिल्या स्थानावर असून मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई तिसऱ्या बंगळुरू चौथ्या तर हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. राज्यात केवळ नाशिकच मुंबईनंतर कार्गो निर्यातीत अग्रेसर आहे.

नाशिकमध्ये केवळ प्रवासी वाहतुकीलाच चांगला प्रतिसाद मिळतो असे नाही तर विमानातून माल वाहतूक करण्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा विशेष करुन नाशवंत माल व फळे, भाजीपाला यासाठी उपयोग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सेवा लाभदायी ठरली आहे. कार्गोमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षी यामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. मे २०२५ महिन्यात तर ११०० मेट्रिक टन इतकी निर्यात येथून झाली असून हा आजवरचा उच्चांक आहे.
- मनीष रावळ, अध्यक्ष, निमा एव्हिएशन कमिटी

Web Title: Latest News Record 1146 million tonnes of agricultural produce exported from Nashik in single month, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.