Kanda Market : बांगलादेशमध्ये आंदोलने सुरू असून यामुळे कांदा दराला त्याचबरोबर निर्यातीला काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांत निर्यात सुरळीतपणे सुरु असल्याने बाजारभाव समाधानकारक होते.
मात्र दोन दिवसांपासून बांगलादेशमध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव काहीसे कमी झाले आहेत. मात्र हे दर टिकून राहतील, अशी आशा आहे. याबाबत अधिक स्पष्टता सोमवार किंवा मंगळवारीपर्यंत येईल.
कालच्या दिवसांत (१९ डिसेंबर) लासलगावला लाल कांद्याचे बाजारभाव १५० रुपयांनी घसरले. तर उन्हाळ कांद्याचे दर ६०० रुपयांनी घसरले. नाशिकमध्ये पोळ कांद्याचे १०० रुपये, उन्हाळी कांद्याचे ५० रुपये, कोल्हापूरमध्ये उन्हाळी कांद्याचे ३०० रुपये आणि पुण्यात २०० रुपयांनी घसरलेले आहेत. थोडक्यात महाराष्ट्र मध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याचे सरासरी दर १४०० ते १५०० रुपये आहेत.
मागील दोन तीन दिवसांचे लाल, उन्हाळ कांद्याचे दर
उन्हाळ कांदा दर १५ डिसेंबर लासलगाव मार्केट - सरासरी २२०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केट १९०० रुपये .
१६ डिसेंबर : लासलगाव मार्केट - २२५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केट - २४०० रुपये
१७ डिसेंबर : लासलगाव मार्केट- २४५१ रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केट - २२०० रुपये
१८ डिसेंबर : लासलगाव मार्केटला सरासरी ०२ हजार रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केट - १७०० रुपये
१९ डिसेंबर - लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत मार्केटला १४०० रुपये दर मिळाला.
लाल कांद्याचे दर १६ डिसेंबर : लासलगाव मार्केट -२५०० रुपये, सोलापूर बाजारात १७०० रुपये
१७ डिसेंबर : लासलगाव मार्केट - २३५१ रुपये, सोलापूर मार्केटला १७०० रुपये
१८ डिसेंबर : लासलगाव मार्केट - २२५० रुपये, सोलापूर बाजारात १३०० रुपये
१९ डिसेंबर : लासलगाव मार्केट - २१०० रुपये, देवळा बाजारात २२०० रुपयापर्यंत दर मिळाला.
Web Summary : Bangladesh's political unrest is affecting onion exports, causing price drops in Maharashtra markets. Lasalgaon saw significant declines. Red and summer onion average ₹1400-₹1500. Future prices uncertain; clarity expected soon.
Web Summary : बांग्लादेश में राजनीतिक अशांति से प्याज का निर्यात प्रभावित, महाराष्ट्र के बाजारों में कीमतें गिरीं। लासलगाँव में भारी गिरावट। लाल और गर्मी के प्याज का औसत ₹1400-₹1500। भविष्य की कीमतें अनिश्चित; जल्द ही स्पष्टता की उम्मीद।