Join us

Kanda Market : अहिल्यानगर, नागपूर कांदा मार्केटमधे दर टिकून, इतर बाजारात काय परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:05 IST

Kanda Market : आज शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda market) ७० हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda market) ७० हजार क्विंटलची आवक झाली.

यामध्ये लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) कमीत कमी ८०० रुपये तरी सरासरी १३४० रुपये दर मिळाला. यानुसार किमान किमतीत सुधारणा झाली असली तरी सरासरी किमतीत मात्र घसरण सुरूच असल्याचे चित्र आहे. 

आज येवला बाजारात सरासरी १०५१ रुपये, चांदवड बाजारात १२०० रुपये, मनमाड बाजारात १३२० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३०० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात ११५० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये, शिरपूर बाजारात १०५० रुपये, तर वडूज बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १४५० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये ०२ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये ११०० रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये असा सरासरी दर मिळाला.  

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक