Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले

ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले

Latest News ovyache bhav Oat arrivals increased, prices increased by Rs 2 thousand per quintal | ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले

ओव्याची आवक वाढली, तरीही क्विंटलला 14 हजार रुपयांपर्यंत दर, 2 हजारांनी दर वाढले

Ova Market : ओव्याला शुक्रवारपासून मागणी वाढली असून, दरही महिनाभरात दोन हजारांनी वाढले आहेत.

Ova Market : ओव्याला शुक्रवारपासून मागणी वाढली असून, दरही महिनाभरात दोन हजारांनी वाढले आहेत.

नंदुरबार : येथील बाजार समितीत ओव्याची आवक महिनाभरापासून सुरू झाली आहे. ओव्याला शुक्रवारपासून मागणी वाढली असून, दरही महिनाभरात दोन हजारांनी वाढले आहेत.

सध्या ओव्याला येथील बाजार समितीत तब्बल १४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. यामुळे ओवा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारात दरदिवशी साधारण १५० क्विंटल ओवा आवक सुरू असून, लाखो रुपयांची उलाढाल सध्या सुरू आहे.

मिरची आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजारात ओवा खरेदीही करण्यात येते. नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक पसंतीचे पीक म्हणून ओवा ओळखले जाते. ओवा हे कमी पाण्यावर उशिराने येणारे पीक असले, तरी त्यातून मिळणारा नफा चांगला असल्याने आदिवासी शेतकरी त्याकडे वळू लागले आहेत. परिणामी, नंदुरबारसह इतर चार तालुक्यांत ओव्याचा पेरा दिवसेंदिवस वाढत आहे.

जानेवारीच्या प्रारंभी प्रतिक्विंटल १२ हजार ६०० रुपयांपर्यंतचे दर मिळत होते, परंतु गेल्या आठवड्यापासून या दरात दोन हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे सध्या ओवा सरासरी १४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. यंदाच्या वर्षातील हे सर्वाधिक दर आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात ओव्याला १३ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता.

गुजरात, राजस्थानकडे मोठी मागणी
नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित होणारा ओवा हा प्रामुख्याने गुजरात, राजस्थान राज्यातील व्यापारी खरेदी करतात. सोबत विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यापारी ओवा खरेदीसाठी येतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत एका महिन्यात तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक ओवा आवक झाली आहे. हा हंगाम एप्रिलपर्यंता सुरू राहणार आहे.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/01/2026
नंदूरबार---क्विंटल6596001500012300
नंदूरबारहायब्रीडक्विंटल1845031202010
27/01/2026
नंदूरबार---क्विंटल149105001555013000
नंदूरबारहायब्रीडक्विंटल2850042002350

 

Budget 2026 : केंद्रानं तिजोरी उघडली, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं?

 

Web Title: Latest News ovyache bhav Oat arrivals increased, prices increased by Rs 2 thousand per quintal