नाशिक : रासायनिक कीटकनाशकांपासून होणारे आजार लक्षात येत असल्याने शहरातील बाजारपेठेमध्ये सेंद्रिय भाजीपाल्याची ४० विक्री वाढली आहे. शहरात आता शासकीय स्तरावरही सेंद्रिय भाजीपाला मार्केट (Organic Vegetable Market) सुरू झाले आहे. शहरात दहा ठिकाणी शासकीय स्तरावर सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू होणार आहे.
रोटरीचा रहाट बाजाराही उपयोगी
उदोजी महाराज म्युझियम, आकाशवाणी टावर शेजारी येथे देखील रोटरीच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला केंद्र सुरू झाले आहे. हा हाट बाजार या नावाने सुरू झालेल्या या ठिकाणी आदिवासी कुटुंब सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी आणतात. दर रविवारी सकाळी ८ वाजेपासूनते ११ वाजेपर्यंत बाजार भरतो.
सेंद्रिय भाजीपाल्याचे फायदे
आरोग्य : या भाज्यांमध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी असतो, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानले जातात.
पर्यावरण : सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि जलप्रदूषण कमी होते.
शाश्वत शेती : ही पद्धत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.
कसे शोधावे केंद्र ?
स्थानिक शेतकरी गट : अनेक ठिकाणी सेंद्रिय शेतकरी एकत्र येऊन गट तयार करतात. हे गट फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती प्रकाशित करतात.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म : अनेक कंपन्या आणि संस्था थेट घरपोच सेंद्रिय भाजीपाला पोहोचवतात. यासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाइट्स किंवा ॲप्सद्वारे ऑर्डर देऊ शकता. नाशिक शहरात लवकरच दहा ठिकाणी शासकीय स्तरावर सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू होणार आहे. त्यातील पहिले विक्री केंद्र उंटवाडी येथे कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात सुरू झाले आहे.
शेतकऱ्याला फायदा व्हावा. इथल्या ग्राहकांना दर्जेदार आणि विषमुक्त शेतमाल मिळावा, या हेतूने रोटरीच्या माध्यमातून रहाट भाजीबाजार सुरू केला आहे. यात संपूर्ण सेंद्रिय भाजीपाला विक्री होतो. सुरवातीला पाच ते दहा शेतकरी होते, आता २० ते २५ शेतकरी सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी आणतात. यातून ग्रामीण भागातील शेतकरी शहरात येऊन समृद्ध होत आहे.
- हेमराज राजपूत, रोटरी क्लब, व्हा. प्रेसिडेंट
Read More : नाशिकचा शेतकरी हाट बाजार, वर्षभर एकच रेट, दोन तासांत भाजीपाला संपून जातो!
