Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूरसह इतर कांदा मार्केटमध्ये दर हजाराच्या खाली आले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:35 IST

Kanda Bajar Bhav : यात सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 59 हजार क्विंटल ची झाली.

Kanda Bajar Bhav : आज सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (Kanda Lilav) बंद असल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात एक लाख पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 59 हजार क्विंटल ची झाली. आज कांद्याला (Kanda Bajar Bhav) कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

कांदा दरात मोठी घसरण (Onion Market) सुरूच आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे. केवळ एक आणि दोन रुपये किलो असा दर हा कांद्याला सद्यस्थितीत मिळतो आहे. आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 650 रुपये दर मिळाला. तर जळगाव बाजारात कमीत कमी 375 आणि सरासरी 812 रुपये दर मिळाला.

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तरी सरासरी 1200 रुपये दर मिळाला. इतर बाजारांपैकी येवला बाजारात 1050 रुपये, नाशिक बाजारात 850 रुपये, सिन्नर बाजारात 1100 रुपये, संगमनेर बाजारात 803 रुपये, चांदवड बाजारात 1160 रुपये तर पिंपळगाव बसवंत बदलता 1150 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/04/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल42891511455803
अकोला---क्विंटल7015001200900
जळगावलालक्विंटल24743751252812
जळगावउन्हाळीक्विंटल64100015001200
कोल्हापूर---क्विंटल427850018001100
नाशिकउन्हाळीक्विंटल5953550513281072
पुणे---क्विंटल247950013001050
पुणेलोकलक्विंटल1110076713331050
पुणेचिंचवडक्विंटल199490015101200
सोलापूर---क्विंटल21030014501000
सोलापूरलोकलक्विंटल711001100950
सोलापूरलालक्विंटल180241001300650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)105219 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक