Onion Market : पैठण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Paithan Market Committee) २०१५ पासून शहरात कांदा खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केल्यामुळे तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८ हजार २४७ टन कांद्याची आवक जास्त झाली आहे. (Onion Market)
२०२३-२०२४ या वर्षात १४ हजार ४४३, तर २०२४-२०२५ या वर्षात २२ हजार ६९० टन कांद्याची आवक झाली, असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. (Paithan Market Committee)
२०१५ पूर्वी कांद्याचे मार्केट पैठणला नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत होते. परंतु, २०१५ नंतर पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने (Paithan Market Committee) शहरात कांदा खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केल्यामुळे तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नगदी पीक म्हणून सध्या तालुक्यातील शेतकरी कांद्याकडे बघत आहेत. शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे बाजार समितीने (Paithan Market Committee) २०२४ मध्ये मोकळा कांदा खरेदी सुरू केली.
मोकळा कांदा मार्केट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून, नवीन लायसन्स धारक व्यापाऱ्यांची संख्या वाढली. जुना भुईकाट्याबरोबरच नवीन भुईकाटा बसण्याचे नियोजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मागील तीन वर्षात ४७ हजार ४७३ टन कांदा बाजार समितीत (Paithan Market Committee) विक्री झाला आहे. यात २०२२ ते २३ या वर्षात १० हजार ३४०, २०२३-२४ या वर्षात १४ हजार ४४३ आणि २०२४-२५ या वर्षात २२ हजार ६९० टन कांद्याची आवक बाजार समितीत झालेली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८ हजार २४७ टन कांद्याची आवक जास्त झाली असल्याची माहिती सचिव नितीन विखे यांनी दिली. ४ हजार ६२० हेक्टरवर रब्बी हंगामात पैठण तालुक्यात कांदा लागवड करण्यात आलेली आहे, तर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल चारशे रुपयांपासून बाराशे रुपयेपर्यंत भाव आहे.
तेलवाडी येथे होणार दहा एकर क्षेत्रात कांदा मार्केट
आ. विलास भुमरे यांच्या प्रयत्नांतून पैठण ते शेवगाव रस्त्यावरील तेलवाडी येथे गायरान जमीन कांदा मार्केटसाठी मिळावी म्हणून प्रस्ताव शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात दहा एकर क्षेत्रांवर फक्त कांदा मार्केट राहणार आहे. या मार्केटमध्ये २० ते २५ खरेदीदार व्यापारी राहणार आहेत. - राजू नाना भुमरे, सभापती, बाजार समिती