Lokmat Agro >बाजारहाट > Nashik Grape Export : नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर 

Nashik Grape Export : नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर 

Latest News Nashik Grape Export 362 containers of grapes leave from Nashik for foreign countries, read in detail | Nashik Grape Export : नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर 

Nashik Grape Export : नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर 

Nashik Grape Export : अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत.

Nashik Grape Export : अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : रशिया-युक्रेन युद्धाचा फटका, बदललेले हवामान, कंटेनरचे वाढलेले भाडे, अशा अनेक समस्यांवर मात करत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) द्राक्ष निर्यातदारांनी चालू हंगामात ६ जानेवारीअखेर ३६२ कंटेनर अर्ली द्राक्ष विदेशात पाठविले असून, याद्वारे ५६८५.७९ मेट्रिक टन माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. यात युरोपीय देशात ६३.४४० तर युरोप खंडाबाहेरील देशात तब्बल ५८५.७९ टन द्राक्ष रवाना करण्यात आली. 

द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक (Nashik Grape Export) जिल्ह्याची ओळख जगभरात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकसह भारतातील द्राक्ष निर्यातदारांसमोर संकट ठाकले होते. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गेच लांबचा पल्ला गाठून सुरू आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे. मात्र, यावरही द्राक्ष निर्यातदारांनी मात केली आहे. अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत.

चालू हंगामात अनेक संकटे अंगाव घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन पूर्वहंगामी अर्ली द्राक्षांच्या निर्यातील वेग दिला आहे. बागलाणसह जिल्ह्यातील निफाड दिंडोरी या भागांतील द्राव उत्पादकाने यंदाही विदेशातील द्राव निर्यातीत आपला पल्ला गाठल आहे. रशिया, मलेशिया अन् संयुक् अरब अमिरातीसाठी गेल्या दो महिन्यांत द्राक्षाचे शेकडो कंटेन समुद्रामार्गे रवाना झाले आहेत नाशिकहून युरोप, रशिय कॅनडा, जर्मनीला द्राक्षांची निर्या केली जाते. जानेवारी महिन उजाडताच युरोपात निर्यात द्राक्षांच्य निर्यातवाढीला चालना मिळाली आहे त्यासाठी द्राक्षबागांचे प्लॉट बुकिं सुरू आहे.

१ लाख ६० हजार उत्पादकांसमोर टनाचे उद्दिष्ट 
जिल्ह्यात डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांसमोर आव्हान उभे होते. तरी यंदाही विदेशातील द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाने सुमारे एक लाख ६० हजार टनांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ५६८५.७९ टन द्राक्षमाल विदेशात पोहोचला आहे. द्राक्षाचा मुख्य हंगाम हा डिसेंबर ते एप्रिलदरम्यान असल्याने या कालावधीत द्राक्ष निर्यातीस बूस्ट मिळणार आहे. या हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून साधारण १६ हजाराहून जास्त शेतकऱ्यांनी २० हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे.

Web Title: Latest News Nashik Grape Export 362 containers of grapes leave from Nashik for foreign countries, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.