Lokmat Agro >बाजारहाट > Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Latest News Nashik ful Bajar Flower prices expected to increase in next week see details | Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Ful Market : त्यामुळे फुलांच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला आत आहे.

Ful Market : त्यामुळे फुलांच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला आत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : गेल्या आठवड्यात गुढीपाडवा (Gudhipadwa), लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, सण, उत्सव संपताच मोगरासह इतर फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. लवकरच लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे आगामी काळात फुलांचे भाव आणखी वधारतील, अशी शक्यता नाशिकमधील फुल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

नाशकात मोगऱ्याच्या (Nashik Ful Bajar) एक किलो फुलांसाठी सहाशे रुपये मोजावे लागत असून, विविध प्रकाराची गुलाबाची (Rose Market) १२ फुले घेण्यासाठी ५० ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत फुलांचे भाव वाढले असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. तर जळगावमध्ये मोगरा शंभर रुपयांनी घसरला आहे. 

जळगाव जिल्ह्यात फुलांमध्ये सर्वाधिक झेंडू या फुलांची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात शिरसोली परिसरातून झेंडू, शेवंती, निशिगंध, गुलाब या फुलांची मोठी लागवड होते. तर चोपडा, रावेर, आमनेर, पाचोरा या तालुक्यांमध्येही काही प्रमाणात झेंडूची लागवड होती. तर बुलढाण्यामधूनही काही प्रमाणात फुलांची आवक जळगाव जिल्ह्यात होते. तर डच गुलाब व इतर विदेशी फुलांची आवक ही मुंबई व पुण्यातून येत असते. 

नाशिकमध्ये आवक घटली 
सणवारांमुळे सध्या नाशकात मोगरा, गुबाल, शेवंती, झेंडू या फुलांना जास्त मागणी आहे. आधीच तीर्थक्षेत्र त्यात आलेल्या सणवारांमुळे येथील व्यापाऱ्यांना फुलांची आवक शेजारील जिल्ह्यांतून जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांहून फुले आणावी लागत आहे. उन्हाची तीव्रता आणि ग्रामीण भागात उपलब्ध पाण्याची कमतरता यामुळे सध्या फुलांची आवक घटली आहे.

गेल्या आठवड्यात वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील..
गेल्या आठवड्यात गुढीपाडवा, रमजान ईद, लग्नसराई असल्यामुळे फुलांच्या दरात वाढ झाली होती. मात्र, सण, उत्सव संपताच फुलांचेही दर कमी झाले. मात्र, पुढील आठवड्यात महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लग्नसराई पुन्हा सुरू होणार आहे. यासह अक्षय तृतीया असे सण राहणार आहेत. त्यामुळे फुलांच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला आत आहे.

असे आहेत फुलबाजार 
मोगरा ६०० रुपये किलो
गुलाब ५०० रुपये शेकडा
तुकडा गुलाब १०० ते १२५ रुपये पिशवी 
डच गुलाब २५० ते ४०० रुपये प्रति शेकडा 
शेवंती २०० रुपये कि.
झेंडू २०० रुपये कि.
गलांडा ३५ ते ३५ रुपये
जास्वंद १०० रुपये शे. 

Web Title: Latest News Nashik ful Bajar Flower prices expected to increase in next week see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.