Nafed Kanda Rate : एकीकडे कांदा भावात सुधारणा (Kanda Market) दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यात नाफेडची कांदा खरेदी संथगतीने सुरू आहे. अशातच नाफेडने काल २६ जुलै रोजी नवा दर जाहीर केला आहे.
गेल्या महिनाभरापासून नाफेडची कांदा खरेदी (Nafed Kanda Kharedi) सुरू असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंड असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये देखील घसरण सुरू असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कांदा बाजाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तत्पूर्वी नाफेडने या आठवड्यातील कांद्याचा दर जाहीर केला असून प्रति क्विंटल 1465 रुपये दर आहे.
दरम्यान DoCA च्या माध्यमातुन हा दर जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील केंद्रावर या दराने खरेदी होत आहे. यापूर्वी नाफेडचा दर १५१५ रुपये इतका होता. म्हणजेच जवळपास ४५ रुपयांची घट झाल्याचे यावरून दिसून येते.
सद्यस्थितीत लासलगाव बाजारात मिळणारा दर पाहता २६ जुलै रोजी प्रति क्विंटल १३७५ रुपये इतका होता. गेल्या आठवडाभरात १२ ते १४ रुपये असा दर मिळत आहे.