Join us

आज नाफेडचा कांदा बाजारभाव काय आहे? लासलगावला काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:32 IST

Nafed Kanda Rate : नफेड कांदा खरेदी सुरू झाल्याचे चित्र आहे, आजचा कांदा दर काय आहे, हे पाहुयात..

नाशिक : नाफेडने कांदा खरेदी (Nafed Kanda Kharedi) सुरु केली असून जवळपास बारा सोसायट्या यात सहभागी झाल्या आहेत. दर तीन चार दिवसांनी नाफेडचा कांदा दर समोर येत आहे. त्या अनुषंगाने आजचा भाव हा १६३० रुपये आहे. दुसरीकडे आज सकाळी लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल १५५० रुपये सरासरी दर मिळाला आहे. 

साधारण एक जुलै पासून नाफेड कांदा खरेदी सुरु झाली असून दर तीन चार दिवसांनी नाफेडचा कांदा दर जाहीर केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील एक आणि नाशिक अकरा अशी बारा केंद्रावर ही खरेदी सुरु झाल्याचे नाफेडने जाहीर केले आहे. आज ५ जुलै रोजीचा कांदा दर १६३० रुपये असल्याचे समोर आले आहे. 

राज्यातील महत्वाच्या पाच बाजार समित्यांच्या कांदा दरावरून हा दर जात असल्याचे समजते. साधारण या बाजार समित्यांच्या तीन दिवसांचा बाजारभाव पाहून हा दर ठरविण्यात येतो. मागील दर पाहिले असता ९ जून रोजी १४३५ रुपये, १५ जून रोजी १५१० रुपये, २१ जून रोजी १६९० रुपये, २८ जून रोजी १६६५ रुपये तर आज ५ जुलै रोजीचा १६३० रुपये दर आहे. 

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी

हेही समजून घ्या.... 

सोमवारी बाजार सुरू झाल्यावर लासलगाव बाजारात सरासरी कांदा बाजारभाव १५५० होते. त्यात थोडी घसरण आणि थोडी वाढ होऊन आज शनिवारी सप्ताहाच्या शेवटी बाजार भाव पुन्हा सोमवार प्रमाणे १५५० रुपये सरासरी प्रति क्विंटल आहेत. नाफेड कांदा बाजारभाव या पेक्षा १२० रुपयांनी जास्त आहेत. विशेषत: ४५ mm कांद्या साठी हे सर्व लक्षात घेता बाजार पुन्हा पूर्ववत होण्यास अनुकूलता दिसत आहे. शेतकर्‍यांना ही दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिक