Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > MSP Tur Kharedi : 31 हजार शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप शिल्लक, तत्पूर्वीच हमीभावाने तूर खरेदी बंद 

MSP Tur Kharedi : 31 हजार शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप शिल्लक, तत्पूर्वीच हमीभावाने तूर खरेदी बंद 

latest news MSP tur Kharedi Only 20.93% of the targeted Tur (Pigeon Pea) procurement has been completed in maharashtra | MSP Tur Kharedi : 31 हजार शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप शिल्लक, तत्पूर्वीच हमीभावाने तूर खरेदी बंद 

MSP Tur Kharedi : 31 हजार शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप शिल्लक, तत्पूर्वीच हमीभावाने तूर खरेदी बंद 

MSP Tur Kharedi : राज्यात एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के, तर उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तुरीची एमएसपी दराने खरेदी केली आहे.

MSP Tur Kharedi : राज्यात एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के, तर उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तुरीची एमएसपी दराने खरेदी केली आहे.

- सुनील चरपे
नागपूर : एसएसपी दराने तूर खरेदीची मुदत ३० एप्रिल राेजी संपुष्टात आली. सरकारने ९० दिवसांमध्ये राज्यात एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के, तर उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तुरीची एमएसपी दराने खरेदी केली आहे. राज्यातील ३१ हजार ७४७ नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील तुरीचे माेजमाप शिल्लक असताना खरेदी बंद करण्यात आली.

सन २०२५-२६ च्या हंगामात राज्यात १२.६१ लाख टन तुरीचे उत्पादन हाेण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने राज्यात ९० दिवसांत ३.३७ लाख टन तूर एमएसपी दराने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तूर खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफने एकूण ९८४ खरेदी केंद्रांना मंजुरी देत ८९७ केंद्र सुरू केले. या केंद्रांवर ७३ हजार ५५५ शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी नाेंदणी केली आणि त्यातील ७० हजार ६२९ शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. या शेतकऱ्यांकडून दाेन्ही संस्थांनी ७०,५३१.४२१४ टन तूर खरेदी केली. ही खरेदी उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तर एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के आहे.

नाफेड व एनसीसीएफने राज्यात २० जानेवारीपासून नाेंदणी तसेच १ फेब्रुवारीपासून खरेदीला सुरुवात केली. चालू हंगामासाठी केंद्र सरकारने तुरीची एमएसपी प्रतिक्विंटल आठ हजार रुपये जाहीर केली हाेती. आयातीमुळे मध्यंतरी चांगल्या प्रतीच्या तुरीचे दर प्रतिक्विंटल ७,००० ते ७,६०० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. सरकारने खरेदीला मुद्दाम विलंब केल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बाजारभावाप्रमाणे तुरी विकल्या. यात त्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.

देशात उत्पादनाच्या ५.२१ टक्के खरेदी
केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२५-२६ च्या हंगामात देशभरात ३४.५५ लाख टन तुरीचे उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. यातील २२ लाख टन तुरी एमएसपी दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला हाेता. १ मे राेजी ही खरेदी बंद करण्यात आली. वास्तवात सरकारने १.८० लाख टन तूर एमएसपी दराने खरेदी केली. ही खरेदी एकूण उत्पादनाच्या ५.२१ टक्के तर उद्दिष्टाच्या ८.१८ टक्के इतकी आहे.

३१ हजार ७४७ शेतकरी शिल्लक
राज्यात नाफेडकडे ६५,३२७ शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी नाेंदणी केली हाेती. यातील ६२ हजार ५४३ शेतकऱ्यांना नाफेडने पाच ठरविले असून, ३४ हजार ७७ शेतकऱ्यांकडून ६३,९४२.१३३५ टन तूर खरेदी केल्याने त्यांच्याकडील २८ हजार ४६६ शेतकऱ्यांकडील तुरीचे माेजमाप शिल्लक आहे. एनसीसीएफकडे८,२२८ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली असली तरी यातील ८,०८६ शेतकरी पात्र ठरविण्यात आले. यातील ४,८०५ शेतकऱ्यांकडील ६,५८९.२८७९ टन तूर खरेदी केली असून, ३,२८१ शिल्लक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील तुरी एमएसपीपेक्षा कमी दराने खुल्या बाजारात विकाव्या लागल्या.

Web Title : MSP तुअर खरीद बंद: हजारों किसान माप का इंतजार कर रहे हैं

Web Summary : MSP पर तुअर की खरीद बंद, 31,000 किसान माप का इंतजार कर रहे हैं। सरकार ने केवल 27.02% उत्पादन खरीदा। किसानों को कम बाजार दर पर बेचने के लिए मजबूर होना पड़ा, जिससे नुकसान हुआ। खरीद लक्ष्य अधूरा रहा।

Web Title : MSP Tur Procurement Halted: Thousands of Farmers Await Measurement

Web Summary : Tur procurement at MSP stopped despite 31,000 farmers awaiting measurement. Government purchased only 27.02% of production. Farmers forced to sell at lower market rates, incurring losses. Purchase target unmet.