Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

latest news Mosambi Bajarbhav: Mosambi is shocked! The price per ton directly reaches 'so many' thousands Read in detail | Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Mosambi Bajarbhav : नरखेड तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. दिवाळीपूर्वी टनामागे २० ते २२ हजार रुपये दर मिळत असलेल्या मोसंबीचे भाव अचानक कोसळून सध्या १५ ते १७ हजार रुपये इतके खाली आले आहेत. (Mosambi Bajarbhav)

भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोसंबीबागा राखून ठेवल्या, मात्र आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.(Mosambi Bajarbhav)

व्यापारी फक्त निवडक माल खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, व्यापारी शेतात येतात, पण हातातल्या हातात फक्त उत्कृष्ट दर्जाची, मोठ्या साईझची मोसंबी निवडून नेतात.
लहान आणि मध्यम साईझच्या फळांकडे व्यापारी लक्षच देत नाहीत.(Mosambi Bajarbhav)

मोठ्या फळांना प्राधान्य

मध्यम/लहान फळे वेगळी काढून ठेवणे

लहान फळे घेतली तरी केवळ १,००० ते २,००० रुपये टनामागे इतका अल्प दर

या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा दुहेरी तोटा

चांगला माल व्यापारी कमी किमतीत घेऊन जातात

उरलेली मोसंबी विक्रीअभावी वाया जाण्याची शक्यता

व्यापाऱ्यांची दिशाभूल – शेतकऱ्यांची लूट

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, व्यापारी जाणीवपूर्वक लहान फळे बाजूला काढून घेतात आणि ती शेतकऱ्यांच्या नावावर बॉक्समध्ये ठेवतात.
पण नंतर ती फळे घेण्यास नकार देतात किंवा अत्यल्प दर देतात.

यामुळे मालाचा मोठा भाग न विकला जाणे

वाहतूक व मजुरी खर्च वाढणे

आर्थिक फटका अधिक बसणे

व्यापारी छोटी मोसंबी खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे लहान फळांचे करायचे काय? हा प्रश्न मोठा बनला आहे.- रमेश जगसेनिया, शेतकरी, जामगाव फाटा

मोसंबी उत्पादन ढासळले

नरखेड तालुका संत्रा–मोसंबी उत्पादनाचा प्रमुख पट्टा. मात्र, या हंगामात अतिवृष्टी, रोगराई, फळगळ, गुणवत्तेत घट यामुळे फळांचे आकारमान कमी झाले. त्यातही व्यापारी फक्त A-ग्रेड मालाला किंमत देत असल्याने शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे.

आर्थिक ताण

कर्जबाजारीपणात आणि बागेतील उत्पादनाच्या नुकसानीत भर पडल्याने, सोमवारी दावसा परिसरातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची 
धक्‍कादायक घटना समोर आली. मोसंबी बागेतून मिळणारा उत्पन्नाचा आधारच ढासळल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे.

लहान मोसंबीचे करायचे काय?

भाव खाली, व्यापारी मनमानी, आणि फळांचा साठा वाढत असल्याने शेतकऱ्यांना पुढील समस्या उभी राहिली आहे 

लहान मोसंबीचा वापर कुठे करायचा?

प्रक्रिया उद्योगामध्ये घेणार का?

जूस फॅक्टरीजना विक्रीचा पर्यायच नाही

बाजारात वेगळा दर अस्तित्वात नाही

या परिस्थितीत शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे आणि उत्पन्न घटत आहे.

मोसंबी बाजारात संकटच संकट

दर २०–२२ हजारांवरून १५–१७ हजारांपर्यंत घसरले

व्यापारी फक्त उत्कृष्ट माल खरेदी करत आहेत

लहान फळांना केवळ १–२ हजारांचा तुटपुंजा भाव

शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक

अतिवृष्टी व रोगांमुळे उत्पादनात घट

बाजारातील मंदीमुळे आत्महत्येसारखी गंभीर परिस्थिती

हे ही वाचा सविस्तर : Mosambi Market : अतिवृष्टीचा तडाखा आणि भावपाडीत व्यापारी जिंकला; हरला तो शेतकरी वाचा सविस्तर

Web Title: latest news Mosambi Bajarbhav: Mosambi is shocked! The price per ton directly reaches 'so many' thousands Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.