Join us

Maka Bajarbhav : मागील आठवड्यात मक्याचे बाजारभाव कसे होते? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 20:05 IST

Maka Bajarbhav : साप्ताहिक सरासरी किमती पाहिल्या असता किमान आधारभूत किमतीपेक्षा बाजारातील किमती सरासरी आहेत. 

Maka Bajarbhav :  मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत २२४० रुपये (Maize Market) प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट (Maka Bajarbhav) झाली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत.

मागील आठवड्याच्या (Last Week Maize Market) तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ११.४३ टक्के इतकी घट झाली आहे व राज्य पातळीवर २१.०३ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी जालना बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक २२४७ रुपये क्विंटल होती, तर छ. संभाजीनगर बाजारात सर्वात कमी किंमत २११८ रुपये क्विंटल होती.

देशभरातील आणि राज्यातील मक्याची आवक पाहिले असता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मक्याच्या आवकेत घसरण पाहायला मिळत आहे. डिसेंबरच्या शेवटी साधारण वीस हजार पण इतकी आवक होत होती, मात्र २६ जानेवारी पर्यंत ही आवक ०८ ते १० हजार टनावर येऊन पोहोचले आहे. दुसरीकडे तर साप्ताहिक सरासरी किमती पाहिल्या असता किमान आधारभूत किमतीपेक्षा बाजारातील किमती सरासरी आहेत. 

मात्र डिसेंबरच्या शेवटानंतर ते जानेवारीच्या शेवटी बाजारात काहीशी वाढ दिसून आली. काही बाजार समित्यांचा विचार करता नांदगाव बाजारात मागील आठवड्यात सरासरी २ हजार २४० रुपये, अमळनेर बाजारात २ हजार २१८ रुपये, धुळे बाजारात २ हजार ८६५ रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात २ हजार ११८ रुपये तर जालना बाजारात २ हजार २४७ रुपये भाव मिळाला.

टॅग्स :मकामार्केट यार्डशेतीकृषी योजना