Join us
Daily Top 2Weekly Top 5

मागील महिनाभरात लाल कांद्याचे दर कसे बदलले, लासलगाव मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:32 IST

Lal Kanda Market : पावसाळ्यात लागवड होणाऱ्या या लाल कांद्यावरच अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. 

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यात लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटलमागे सुमारे ३०० रुपयांची घट झाली असून, अवघ्या तीन आठवड्यांत कांद्याचे दर तब्बल १४५० रुपयांनी गडगडले आहेत.

गेल्या मंगळवारी, दि. १३ पासून कांद्याचे कमाल दर दोन हजार रुपयांच्या आत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ज्या भागात धरण, कालवे, पाटपाणी यांची सोय नाही, पाण्याअभावी उन्हाळी किंवा बारमाही पिके घेणे शक्य नाही अशा भागात लाल कांदा हे एकमेव नगदी पीक घेतले जाते. पावसाळ्यात लागवड होणाऱ्या या लाल कांद्यावरच अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. 

शेतकऱ्यांच्या हाती ३० ते ५० हजार रुपयेचया पिकाचा उत्पादन खर्च तुलनेने जास्त असून, उत्पादन मात्र मर्यादित मिळते. मशागत, खते, बियाणे, लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च, मजुरी, बाजार समितीत विक्रीसाठी वाहतूक खर्च धरून एकरी सुमारे ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत बाजार समितीत कांदा विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती केवळ ३० ते ५० हजार रुपयेच हाती येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आठवड्यात किती घसरण झाली? लाल कांद्याची आवक सुरू १ झाल्यानंतर वर्ष २०२५ च्या अखेरच्या आठवड्यात प्रतिक्विंटल ३२०१ रुपयांपर्यंत दर मिळाले होते. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत गेले. सध्या किमान दर ५०० रुपये, कमाल दर १७५२ रुपये, तर सरासरी दर २२०० रुपयांवरून थेट १५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. अवघ्या तीन आठवड्यांत किमान दरात १४५० रुपये, तर सरासरी दरात सुमारे ७०० रुपयांची घसरण नोंदवली गेली.

असे आहेत बाजार समितीतील बाजारभाव (प्रतिक्विंटल)

दिनांककिमानकमालसरासरी
२४ डिसेंबर७०० रुपये ३२०१ रुपये १८५१ रुपये 
२९ डिसेंबर७०० रुपये २९५१ रुपये १८५१ रुपये 
०१ जानेवारी७०० रुपये २६११ रुपये १८७० रुपये 
०२ जानेवारी६०० रुपये २३९० रुपये १८०० रुपये 
०६ जानेवारी६०० रुपये २१५२ रुपये १५०० रुपये 
१२ जानेवारी६०० रुपये २०४१ रुपये १५५० रुपये 

२१ जानेवारी

५०० रुपये १७५२ रुपये १५०० रुपये 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Red Onion Prices Plummet in Lasalgaon, Farmers Face Hardship

Web Summary : Lasalgaon's red onion prices have drastically fallen, severely impacting farmers. Prices dropped by ₹1450 per quintal in three weeks. Farmers struggle to cover production costs, receiving only ₹30-50,000, against expenses of ₹80-90,000 per acre.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक