Join us

Kothimbir Market : ओल्या आणि कोरड्या कोथिंबीरीच्या जुडीच्या दरात फरक, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:14 IST

Kothimbir Market : कोथिंबीरीचा ओला माल १ हजार रुपये शेकडा आणि कोरड्या कोथिंबीरला १० हजार रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सायंकाळी विक्रीसाठी आलेल्या ओल्या कोथिंबीर जुडीला १० तर कोरड्या मालाला १०६ रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याची माहिती नितीन लासुरे यांनी दिली आहे. 

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून शनिवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी कृषी मालाची आवक घटली. कोथिंबीरीचा ओला माल १ हजार रुपये शेकडा आणि कोरड्या कोथिंबीरला १० हजार रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाला. पावसामुळे शेतातील उभे पीक खराब झाले तर काही ठिकाणी पावसामुळे शेतातील तयार पिके काढण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक बऱ्यापैकी कमी झाली आहे. 

वाचा आजचे बाजारभाव 

आज कोल्हापूर बाजार समितीत सर्वसाधारण कोथिंबिरीची 42 क्विंटलची आवक झाली. या कोथंबीरीला सरासरी 2500 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे खडकी बाजारात कोथिंबिरीच्या 1750 नगांची आवक झाली. या ठिकाणी केवळ सरासरी सहा रुपये जुडीला दर मिळाला. पुणे पिंपरी बाजारात 3150 नगांची आवक झाली. या ठिकाणी जुडीला 08 रुपये दर मिळाला. तर पुणे मोशी बाजारात सर्वाधिक 29 हजार 200 जुड्यांची आवक झाली. तर जुडीला 08 रुपये दर मिळाला. मंगळवेढा बाजार समितीत केवळ जुडीला तीन रुपये दर मिळाला.

टॅग्स :भाज्यानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती