Kapus Market : एकीकडे महाराष्ट्रातील बहुतांश कापूस पट्ट्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरात कापसासह सोयाबीनचे पिके पूर्णतः नष्ट झाल्याचे पाहायला मिळाले. सद्यस्थितीत सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यात कापसाला कसे दर मिळतील, ते पाहुयात...
खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) रु. ७७१० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १४.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
तर मागील तीन वर्षातील कापसाचे सरासरी बाजारभाव पाहिले तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ८६३२ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२३ मध्ये ७१७३ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२४ मध्ये ७४२४ रुपये प्रति क्विंटल अशा किंमती राहिल्या. तर सध्या सुरु असलेल्या ऑक्टोबर २०२५ मध्ये कापसाच्या किमती अंदाजे रु. ७ हजार ३१० रुपये ते ७ हजार ८२० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
कापसाची आवक घटली
देशात चालू वर्षीच्या ऑगस्ट २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या ऑगस्ट २०२४ च्या तुलेनत ६३.३० टक्क्यांनी घटली आहे. USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन २५.४ दशलक्ष ४८० Ib bales आहे., शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षे मुळे पेरणी केलेल्या १२.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.