Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Market : शेतकऱ्यांनो! नवीन वर्षात कापसाला चांगला भाव मिळेल, पहा जानेवारीतील अंदाज

Kapus Market : शेतकऱ्यांनो! नवीन वर्षात कापसाला चांगला भाव मिळेल, पहा जानेवारीतील अंदाज

Latest News Kapus market Estimated potential price of the cotton crop for the January 2026 period | Kapus Market : शेतकऱ्यांनो! नवीन वर्षात कापसाला चांगला भाव मिळेल, पहा जानेवारीतील अंदाज

Kapus Market : शेतकऱ्यांनो! नवीन वर्षात कापसाला चांगला भाव मिळेल, पहा जानेवारीतील अंदाज

Kapus Market : कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) ७७१० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. 

Kapus Market : कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) ७७१० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. 

Kapus Market : देशात चालू वर्षीच्या नोव्हेंबर २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या नोव्हेंबर २०२४ च्या तुलेनत ३४.८३ टक्क्यांनी घटली आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) ७७१० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. 

मागील तीन वर्षातील अकोला बाजारातील कापसाच्या जानेवारी महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे, तर जानेवारी २०२३ मध्ये ८ हजार २९६ रुपये प्रति क्विंटल, जानेवाररी २०२४ मध्ये ६ हजार ८३८ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२५ मध्ये ७ हजार २०७ रुपये प्रति क्विंटल होते. 

तर नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२६ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार २६० रुपये प्रति क्विंटल ते ७ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल राहतील, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ११ टक्के आयात शुल्क निलंबित करण्याची घोषणा केली.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १४.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. माहे डिसेंबर २०२५ ची किंमत (दि. २० डिसेंबरपर्यंतची आहे). 

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय आयात आणि निर्यातीत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आयात आणि निर्यातीत सरासरी ६% वाढीसह जागतिक स्तरावर हाच कल दिसून येत आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी २०२६ या कालावधीसाठी कापूस पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. 

Web Title : कपास बाजार: नए साल में अच्छे दाम की उम्मीद, जनवरी का पूर्वानुमान

Web Summary : कपास की आवक घटी। MSP ₹7710/क्विंटल है। जनवरी 2026 में कीमतें ₹7260-₹7700/क्विंटल हो सकती हैं। आयात शुल्क निलंबित। कपास उत्पादन बढ़ने की उम्मीद है। राष्ट्रीय आयात और निर्यात में वृद्धि।

Web Title : Cotton Market: Good Prices Expected in New Year, January Forecast

Web Summary : Cotton arrival decreased. MSP is ₹7710/quintal. January 2026 prices may range ₹7260-₹7700/quintal. Import duty suspended. Cotton production is expected to increase. Increased national import and export.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.